covid 19 vaccination certificate  Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईत 1500 रुपयांत कोरोना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कोरोना संसर्गाने त्रस्त असलेल्या मुंबईत काही लोक कोरोना लसीकरणाची बनावट प्रमाणपत्रे तयार करत आहेत.

दैनिक गोमन्तक

मुंबई: कोरोना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे . गोरेगाव परिसरात मोठी कारवाई करत गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी लस न घेतलेल्यांना लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्र देत होते आणि त्याबदल्यात 1500 रुपये घेत होते. या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम भागातील काही तरुण कोरोना लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्र बनवण्याचे काम करत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली. ही टोळी कोरोना लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्र बनवून लोकांना फसवत होती. हा सुगावा मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने बीएमसीच्या पथकासह गोरेगाव परिसरात छापा टाकला आणि तेथून दोन आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मुंबई गुन्हे शाखेने लसीची अनेक बनावट प्रमाणपत्रेही जप्त केली आहेत. अधिका-यांनी सांगितले की, ही टोळी ज्यांनी कोविड-19 लसीचा डोस घेतलेला नाही अशा लोकांना कोरोना लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्रे देत होते. आतापर्यंत या लोकांनी एकूण 70 ते 75 जणांना कोरोना लसीकरणाची बनावट प्रमाणपत्रे विकली आहेत. बनावट प्रमाणपत्राच्या बदल्यात ही टोळी लोकांकडून 1500 रुपये घेत असे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, लसीचे बनावट प्रमाणपत्र बनविण्याचा हा धंदा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता.

या कारवाईनंतर या दोन आरोपींशिवाय या टोळीत आणखी कोण-कोण सामील आहेत आणि या टोळीने आतापर्यंत किती लोकांची अशा प्रकारे बनावट प्रमाणपत्रे बनवून फसवणूक केली आहे, याचा शोध घेण्यामध्ये गुन्हे पथक गुंतले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला थेट पोलीस ठाण्यातून उचलले; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT