मुंबईतील खार परिसरात एका परदेशी महिला यूट्यूबरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही मुलगी व्हिडीओ शूट करत असताना तेथील काही मुलांनी तिची छेड काढली. ही मुलगी दक्षिण कोरियाची (South Korea) नागरिक असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
खार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मोबीन चांद मोहम्मद शेख (वय 19 वर्षे) आणि मोहम्मद नकीब सदरेआलम अन्सारी (वय 20 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दोन दिवसांपूर्वी ही तरुणी खार परिसरात लाईव्हस्ट्रीमिंग करत होती. यावेळी तिथे दोन तरुणांनी तिचा हात पडकून खेचण्याचा, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण या तरुणीने त्यांना दूर केले. ही तरुणी घटनास्थळावरुन दूर जाऊ लागल्यानंतर तोच तरुण आपल्या एका मित्रासह बाईकवरुन पुन्हा तिच्या दिशेने आला आणि तिला जिथे जायचे आहे सोडण्याची ऑफर दिली. पण तिने त्याची ऑफर नाकारली, असं या व्हिडीओमध्ये (Video) दिसत आहे.
यूट्यूबरच्या फॉलोअरने ही घटना ट्विटरवर शेअर केली
हा सर्व प्रकार तिच्या एका फॉलोअरने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मेंशन करुन संबंधित व्हिडीओ ट्विटरवर (Twitter) शेअर केला. त्यात लिहिले की, "पीडित तरुणी ही दक्षिण कोरियाची नागरिक आहे. खार परिसरात लाईव्हस्ट्रीमिंग करत असताना काही स्थानिक तरुणांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले."
दरम्यान, संबंधित यूट्बूरने (Youtuber) देखील या घटनेबाबत ट्वीट केले आहे. तिने लिहिले आहे की, काल रात्री लाईव्हस्ट्रीमिंगदरम्यान एका तरुणाने मला त्रास दिला. हे प्रकरण फार वाढू नये आणि तिथून निघून जाऊ यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केला, कारण तो त्याच्या मित्रासोबत होता. पण काही लोकांनी म्हटले की मी फारच फ्रेण्डली वागू लागल्यामुळे आणि बातचीत सुरु केल्यामुळे हा प्रकार घडला. या घटनेने मला स्ट्रीमिंगबाबत पुन्हा एकदा विचार करण्यासाठी भाग पाडले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.