Sindhudurg Crime Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Pramod Yadav

Sindhudurg Crime

सिंधुदुर्ग: देवगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिंसासह त्यांच्या मित्रांनी १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा विनयभंग केला.

याप्रकरणी वसई वाहतूक विभागाच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. सर्वजण सुट्टीसाठी गोव्यात जात असाताना ही घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ही घटना घडली.

हरिराम मारुती गिते (३५) आणि प्रवीण विलास रानडे (३४) (दोघेही रा. वसई, मूळ नांदेड) असे निलंबित करण्यात आलेल्या दोन पोलिस कॉन्स्टेबलची नावे आहेत.

तसेच, माधव केंद्रे (३३), सतवा केंद्रे (३२), श्याम गिते (३५) आणि शंकर गिते (३४) (सर्वजण रा. कंदार, नांदेड) असे गुन्हा नोंद झालेल्या इतर संशयितांची नावे आहेत. सर्वजण मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांनी महाविद्यालयातून घरी जाणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थीनीला कारमध्ये ओढून विनयभंग केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबित दोन पोलिस आणि इतर संशयित गोव्यात सुट्टी घालविण्यासाठी जात होते. देवगडमध्ये आल्यानंतर महाविद्यालयातून परत घरी जाणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थीनीला त्यांनी अडवून गाडीत बसण्यास सांगितले.

मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या पोलिसांनी मुलीला वसई घेऊन जाण्याची भाषा करत तिला गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा करत मदत मागितली.

आरडाओरडा ऐकूण स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होत कार थांबवून महिलेची सुटका केली. स्थानिकांनी संशयितांना चोप देऊन देवगड पोलिसांच्या स्वाधीन केले.

दोन्ही संशयित कॉन्स्टेबलना मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी निलंबित केले असून, देवगड पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT