Crime News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Cyber Fraud: सारवी, कविता, दिनाज, जास्मिन... चौघींच्या प्रेमात 80 वर्षीय मुंबईकर कंगाल, 9 कोटींना घातला गंडा

Mumbai Crime News: फेसबुकवरील ओळखीच्या माध्यमातून सुरू झालेल्या संवादाने २१ महिन्यांत वृद्धाची जवळपास ९ कोटी रुपयांची आयुष्यभराची बचत गमावली.

Sameer Amunekar

मुंबईतील एका ८० वर्षीय वृद्धाचे आयुष्य सोशल मीडियावरील एका मैत्रीने पूर्णपणे उद्ध्वस्त केले. फेसबुकवरील ओळखीच्या माध्यमातून सुरू झालेल्या संवादाने २१ महिन्यांत वृद्धाची जवळपास ९ कोटी रुपयांची आयुष्यभराची बचत गमावली. सायबर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा वृद्ध आपल्या मुला व सुनेसोबत मुंबईत राहतो. एप्रिल २०२३ मध्ये त्याने फेसबुकवर 'सारवी' नावाच्या अनोळखी महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. सुरुवातीला सारवीने ही रिक्वेस्ट नाकारली, मात्र काही दिवसांनी तिनेच त्याला रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले आणि लवकरच व्हॉट्सअॅप नंबरची देवाणघेवाण झाली.

सारवीने स्वतःला पतीपासून वेगळी राहणारी, मुलांसोबत राहणारी महिला म्हणून सांगितले. हळूहळू ती त्या वृद्धाकडे मुलांच्या आजारपणाचे कारण देऊन पैसे मागू लागली. काही काळाने 'कविता' नावाच्या दुसऱ्या महिलेने संपर्क साधला आणि सारवीकडून नंबर मिळाल्याचे सांगून त्याच्याशी मैत्री केली. कविता देखील अश्लील मेसेज पाठवत असे आणि मुलांच्या उपचारांसाठी पैशांची मागणी करत असे.

डिसेंबर २०२३ मध्ये परिस्थिती आणखी वाईट वळणावर गेली. आंतरराष्ट्रीय नंबरवरून 'दिनाज' नावाच्या महिलेने संपर्क साधला. तिने स्वतःला सारवीची बहीण म्हणून सांगितले व सारवीच्या मृत्यूची माहिती दिली. मरण्यापूर्वी हॉस्पिटलचे बिल भरण्याची इच्छा सारवीने व्यक्त केल्याचा दावा करत, तिने स्क्रीनशॉट्स पाठवून वृद्धाकडून मोठी रक्कम उकळली. पैसे परत मागितल्यावर तिने आत्महत्येची धमकी दिली.

यानंतर 'जास्मिन' नावाची आणखी एक महिला या प्रकरणात सामील झाली. तिने स्वतःला दिनाजची मैत्रीण म्हणून सांगितले आणि मदतीची विनंती केली. वृद्धाने तिलाही पैसे दिले. पैशांची गरज भागवण्यासाठी त्याने सुनेकडून २ लाख रुपये उधार घेतले.

एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीत, वृद्धाने एकूण चार महिलांना ७३४ व्यवहारांद्वारे तब्बल ८.७ कोटी रुपये दिले. पैशांची मागणी सुरूच राहिल्याने त्याने मुलाकडे ५ लाख रुपये मागितले. मुलाने चौकशी केल्यावर त्यांनी संपूर्ण प्रकरण समोर आलं.

शेवटी, २२ जुलै रोजी वृद्धाने सायबर पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला. ६ ऑगस्ट रोजी मध्यवर्ती सायबर पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून, तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, लोक ओक्साबोक्शी रडले; रवींच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर

राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू, सहा दिवसांसाठी मुख्यमंत्री ते गोव्याच्या राजकारणाचे 'कर्णधार'; 'रवी नाईक' यांची अनोखी कहाणी!

Viral Video: डोनाल्ड ट्रम्प माझे पप्पा...! राखी सावंतचा ट्रम्प कनेक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ, नेटकरी म्हणाले, "अमेरिकेची पुढची प्रेसिडेंट राखी ट्रम्प"

अरे हिरो...! रोहित शर्मा नवीन कर्णधार शुभमन गिलला पहिल्या भेटीत काय म्हणाला? विराट कोहलीला गाडीत बसलेलं पाहिलं अन्... Video Viral

Davorlim Panchayat: ''भाजपचं गलिच्छ राजकारण चाललंय'', शेवटच्या क्षणी पंचायत निवडणूक रद्द! दवर्ली पंचायतीत हाय व्होल्टेज ड्रामा

SCROLL FOR NEXT