MPSC Exam Dainik Gomantak
महाराष्ट्र

उद्या एमपीएससीची पूर्व परीक्षा; आयोगाने केल्या 'या' सूचना प्रसिद्ध

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित 'गट-ब' संयुक्त पूर्व परीक्षा 2021 उद्या शनिवारी दि. 26 फेब्रूवारी रोजी पार पडत आहे. यावेळी राज्यातील तीन लाख 62 हजार 319 परीक्षार्थी (Exam) हि परीक्षा देणार आहेत. राज्यातील 37 जिल्ह्यांत 1098 उपकेंद्रांवर हि परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. (MPSC Preliminary Exam Latest News)

या परीक्षेच्या दोन्ही सत्रांमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अर्थात MCQ पध्दतीची प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षा कक्षात प्रवेश करतेवेळी उमेदवारांकडे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड या पैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे हे अनिवार्य आहे. तसेच प्रवेशपत्र, काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन, ओळखपत्र, सॅनिटायझर, पाणी बॉटल, या व्यतिरिक्त इतर कोणतेही साहित्य परीक्षा कक्षात घेऊन जाण्यास विद्यार्थ्यांना परवानगी नाही.

परीक्षा कक्षात मोबाईल (Mobile) अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही. परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाइक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश नाही. परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पार्किंगसाठी परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT