MP Navneet Rana and Ravi Rana Dainik Gomantak
महाराष्ट्र

खासदार नवनीत राणा अन् रवी राणा यांना HC ने दिला मोठा झटका

हनुमान चालिसा वादात अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला उच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

हनुमान चालिसा वादात अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला उच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. एफआयआर रद्द करण्याच्या त्यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळली आहे. एक दिवसापूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी (Police) अटक केलेल्या राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. एफआयआर रद्द करण्यास नकार देताना, सर्वोच्च पदावर असलेल्यांनी अधिक जबाबदारी दाखवावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, नवनीत राणा आणि त्यांच्या पतीने शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केली होती. मुंबई पोलिसांनी त्यांना याबाबत नोटीस देऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, असा इशारा दिला होता. मात्र, शनिवारी शेकडो शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या घराबाहेर जमल्याने त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला होता.

तसेच, खासदार नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी भायखळा महिला कारागृहात हलवले आहे. त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. नवनीत राणा यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एफआयआर रद्द करावी, यासाठी नवनीत राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर सुनावणी झाली. राणा दाम्पत्याला शनिवारी अटक करण्यात आली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर निदर्शने केली. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. त्यात देशद्रोहाचा आरोपही जोडण्यात आला. रविवारी मुंबई न्यायालयाने राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. रविवारी रात्री उशिरा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भायखळा महिला कारागृहात नेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT