More than 57,000 corona patients have been found in Maharashtra in the last 24 hours. 
महाराष्ट्र

महाराष्ट्रात 24 तासात 920 रुग्णांचा मृत्य तर, 57006 रुग्णांना डिस्चार्ज

दैनिक गोमंतक

कोरोना संक्रमणाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या महाराष्ट्रात मागच्या 24 तासांत 57 हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 920 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एका दिवसात आलेल्या मृत्यूचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. (More than 57,000 corona patients have been found in Maharashtra in the last 24 hours.)

राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेताना शहरानुसार विचार केल्यास पुणे शहरात कोरोनाचे सर्वात जास्त (9084 नवीन) कोरोना रुग्ण आढळून आले असून, 93 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई शहरात मागच्या 24 तासात कोरोनाचे 3882 नवे रुग्ण आढळून आले असून, 77 लोकांचा मृत्यू झाला आहे. विदर्भ विभागातील नागपूर शहरात 4,433 नवे रुग्ण आढळून आले असून 57 लोकांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात देखील मागच्या 24 तासांत 3,767 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून, 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील (Maharashtra) नाशिक हे असे शहर आहे जिथे कोरोनामुळे 100 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सकारात्मक गोष्ट ही आहे की मागच्या 24 तासांत तब्बल 57,006 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना पॉझिटिव्ही होण्याचा दर सध्या 17.19 टक्के एवढा असून रिकव्हरी रेट 85.32 टक्के एवढा आहे. कोरोनामुळे मृत्यू (Corona Deaths) होण्याचे प्रमाण 1.49 टक्के एवढे असल्याचे समजते आहे.  

देशाचा विचार केला तर देशात मागच्या 24 तासांत 3,82,315 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळून आले आहेत. तर विशेष बाब म्हणजे यातील 71 टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि दिल्ली सहित 10 राज्यांत सापडले आहेत. या सर्व नव्या आकडेवारीसह देशात कोरोना रुग्णांची संख्या 2,06,65,148 एवढी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चहा विकून महिन्याला 9 लाखांची बक्कळ कमाई! चहावाल्यानं सांगितलं यशाचं गमक; म्हणाला, 'PM मोदींच्या संघर्षातून घेतली प्रेरणा...'

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

Colvale Central Jail: पाणीटंचाई, तुटलेली गटारे आणि डासांचा प्रादुर्भाव, कोलवाळ कारागृहात मानवाधिकार आयोगाची अचानक धडक; कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Scrub Typhus Spread In goa: गोव्यात 'स्क्रब टायफस'चा धोका वाढला! 827 जण बाधित; तिसवाडी, मुरगावात सर्वाधिक रुग्ण

Sarmanas Villagers Protest: ‘वेदान्ता’ची खनिज वाहतूक रोखली! सारमानसवासीय पुन्हा आक्रमक; चार तास वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT