weather department
weather department Dainik Gomantak
महाराष्ट्र

Monsoon Update: राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

दैनिक गोमन्तक

हवामान खात्याने (weather department) राज्यात पाऊस (Rain) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेले काही दिवस राज्यामध्ये अनेक प्रदेशात तुरळक पाऊस सुरु आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीसह, पश्चिम महाराष्ट्रात पाऊसाला सुरुवात झाली आहे.

याच दरम्यान आता पुन्हा भारतीय हवामान खात्याकडून पूर्व मध्य व पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे असे सांगण्यात आले आहे. हवेच्या वरच्या पट्टीतील चक्राकार द्रोणीय स्थितीजन्य परिस्थिती महाराष्ट्रपर्यंत येईल.

याचा परिणाम राज्यात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची पडण्याची शक्यता आहे. यामुळे मच्छिमारांनी (fishermen) 21 आणि 22 नोव्हेंबरला अरबी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन ही हवामान खात्याने केले आहे.

तसेच, अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. याचा परिणाम किनारपट्टी आणि येथील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी गडगडटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे. तसेच गेले काही दिवस राज्यातमध्ये अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT