Raj Thackeray  Dainik Gomantak
महाराष्ट्र

...म्हणून इतर कोणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये: राज ठाकरे

राज ठाकरे यांनीच आता मनसेचे पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली. उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी तर राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी अशी मागणी केली आहे. अशा प्रतिक्रियांना उत्तर देण्यासाठी मनसेचे पदाधिकारी पुढे सरसावले आहेत. (MNS chief Raj Thackeray warns his party members)

मात्र राज ठाकरे यांनीच आता मनसेचे पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पत्र जारी केले आहे. यामध्ये ठाकरे लिहितात, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी… माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत, ते याबाबत बोलतील. इतर कोणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये.”

तसेच “इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे. जय महाराष्ट्र!” असे म्हणत राज ठाकरे यांनी सर्वच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कडक सूचना दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT