Raj Thackeray
Raj Thackeray  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Viral video: 'काही जगू द्याल की नाही'; राज ठाकरे पुण्यात पत्रकारांवर भडकले

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. यासाठीच सध्या ते दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणूक आणि पुण्यात पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. (MNS chief Raj Thackeray furious with reporters in Pune)

दौ-याच्या पहिल्याच दिवशी राज हे पुस्तक खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र बाजीराव रस्त्यावरील पुस्तकाच्या दुकानाच्या बाहेरच पत्रकारांनी त्यांना घेरले. यावर राज ठाकरे भडकले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून त्यांनी ‘काही जगू द्याल की नाही?’ असे म्हणत त्यांना कॅमेरे बंद करायला लावले. हा प्रसंग अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 8 च्या सुमारास राज ठाकरे बाजीराव रस्त्यावरील अक्षरधारा बुक गॅलरीत पुस्तक खरेदी करण्यासाठी पोहोचले. दरम्यान, ठाकरे यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या काही लोकांनी दुकानाबाहेर गर्दी केली. गाडीतून उतरल्यानंतर राज ठाकरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापले. ते प्रतिनिधी ठाकरेंच्या जवळ येऊन फोटो काढू लागल्यानंतर राज यांनी, ‘ए लाईट बंद करा रे, काही जगू द्याल की नाही’ अशा शब्दांत माध्यम प्रतिनिधींना खडसावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's News Wrap: शशी थरूर, पवन खेरा गोव्यात, शहांची शुक्रवारी सभा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT