mns tweeted on mumbai goa national highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

हतबल राज्यकर्ते, मस्तवाल कंत्राटदार! मनसेची टिका; मुंबई गोवा महामार्गाबाबतचा व्हिडिओ केला ट्विट

मनसेने मंत्री गडकरी उपमुख्यमंंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिलेल्या उत्तरांच्या व्हिडीओ ट्विट केला आहे

Rajat Sawant

MNS Tweet On Bjp Nitin Gadkari And Devendra Fadnavis On mumbai goa highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्याच्या चौपदारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे तर काही ठिकाणी चौपदारीकरणाचे काम रखडलेले आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने या मुंबई गोवा महामार्गाला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. याचा प्रवाशांना मोठा त्रास होत आहे.

या खड्ड्यांमुळे वाहनांचा अपघात झाल्याचे प्रकार समोर येत आहेत मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. दरम्यान आता यावर मनसेने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत सभागृहात दिलेली उत्तरे ट्विट करत टिका केली आहे.

मनसेच ट्विट

मनसेने मंत्री गडकरी उपमुख्यमंंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिलेल्या उत्तरांच्या व्हिडीओ ट्विट केला आहे. "अखेर मुंबई-गोवा हायवेसाठी राज्यकर्त्यांनीही हात टेकले... सर्वसत्ताधीश नेत्यांची उत्तरं ऐका... असे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार असतील तर कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची? हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रखर 'राज'कीय इच्छाशक्ती हवी !" असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

वाहतूक मंत्री गडकरी लोकसभेत म्हणाले

मुंबई गोवा महामार्गाबाबत गडकरींना लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना गडकरी म्हणाले, "अध्यक्ष महोद्य, मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याबद्दल माझ्याकडे उत्तर नाही आहे. हे दुर्देवी आहे. या महामार्गाच्या कामाबद्दल माझ्या मनात अपराधीपणाची भावना येत आहे. मुंबई ते गोवा व सीधी-सिंगरौली या मार्गावर पुस्तक लिहीता येईल" असे मंत्री गडकरी म्हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले

"मुंबई गोवा महामार्गाच्या कामामध्ये कधी कायदेशीर, कधी कंत्राटदारांच्या अशा अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत. त्यामुळे सरकारसमोर अडचणीची स्थिती निर्माण होत आहे. या महामार्गासाठी मंत्री गडकरी यांनी स्वत: सुध्दा प्रयत्न केले."

"गडकरींनी देशात रस्ते बांधण्याच रेकॉर्ड ब्रेक काम केलं आहे. मात्र, या रस्त्याच्या कामात अडचणी येत आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत उत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT