Bacchu kadu
Bacchu kadu Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

दैनिक गोमन्तक

अकोला जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावात पालकमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा ठपका वंचित बहुजन आघाडीने केला होता. या प्रकरणी आपल्याला अटकपुर्व जामीन मिळावा अशी मागणी कडू यांनी केली होती. यावर आज जिल्हा सत्र न्यायालयाने कडू यांचा आज अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. (Minister of State Bachchu Kadu granted pre-arrest bail by court )

ही तक्रार 24 मार्च रोजी दाखल झाल्यानंतर न्यायालयाने कलम 156 (3) नुसार पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. अकोला शहर कोतवाली पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली होती.

त्या तक्रारीवर न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई करून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पालकमंत्री लोकसेवक असल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी ९० दिवसांच्या आत राज्यपालांची परवानगी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान,वंचितच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती.

राज्यपालांनी कायद्यानुसार दस्तऐवज सादर करण्याचे सांगितले होते. तसेच राज्यपालांनी नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले होते. तसेच पोलिसांनी राज्यमंत्री कडू यांचे विरोधात भादंवि कलम 405, 409 , 420, 468 , 471 नुसार गुन्हा दाखल केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Urban Bank : आमचे पैसे आम्‍हाला परत करा! ‘म्‍हापसा अर्बन’च्‍या ठेवीदारांची आर्त हाक

Margao News : जनाधार कमी झाल्‍यानेच फळदेसाईंचे आरोप; सावित्री कवळेकर यांचा दावा

Mani Shankar Aiyar: ‘’पाकिस्तानची इज्जत करा, त्याच्याकडे अणुबॉम्ब...’’; सॅम पित्रोदा यांच्यानंतर मणिशंकर अय्यर बरळले

Siolim Water shortage : सागर उशाला; तरी कोरड पडलीय घशाला! आसगाव, शापोरावासीयांची व्यथा

Panaji News : पाटकर यांनी माफी मागावी; आमोणकरांची मागणी

SCROLL FOR NEXT