मेहबूब शेख Dainik Gomantak
महाराष्ट्र

‘मुन्ना झुंड में बहुत लोग आते हैं, शेर अकेला आता हैं’; महेबूब शेख यांचा भाजपवर निशाणा

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर फडणवीस (Fadnavis) यांनी केलेल्या आरोपानंतर नवाब मालिकांनी त्यांना पुन्हा उत्तर देत ते म्हणाले तुम्हाला दिवाळी (Diwali) नंतर बॉम्ब फोडण्याची गरज नाही.

दैनिक गोमन्तक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर नवाब मालिकांनी त्यांना पुन्हा उत्तर दिले असून ते म्हणाले तुम्हाला दिवाळी नंतर बॉम्ब फोडण्याची गरज नाही. महेबूब शेख यांनी त्यावर सुपरस्टार रजनीकांत यांचा एक डायलॉग ट्विट करत भाजपावर निशाना साधला आहे. ‘मुन्ना झुंड में तो … आते हैं, शेर अकेला आता हैं’, असे शेख म्हणाले.

मेहबूब शेख म्हणाले, नवाब मालिकांनी फडणवीस यांना उत्तर दिले नंतर, मला रजनीकांत यांच्या ‘शिवाजी द बॉस’ फिल्म मधील डायलॉग आठवतो. तो असा की, ‘मुन्ना झुंड में तो … आते हैं, शेर अकेला आता हैं’! असे शेख म्हणाले.

नवाब मलिक हे गेले अनेक दिवस समीर वानखेडे यांच्या संबंधित काही कागदपत्रे सोशल मीडिया तसेच माध्यमांना शेअर करत आहेत. मालिकांना वानखेडेंना धारेवर धरले आहे. तसेच आर्यन खानच्या सुटकेनंतर हे प्रकरण काहीस नरमले होते. त्यानंतर नवाब मलिकांनी या प्रकरणावर पुन्हा भाष्य करणे सुरु केले. नवाब मलिक यांनी ट्विटर याबाबत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. भाजप आणि ड्रग्ज व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला होता. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा होता. अमृता फडणवीस यांनी मालिकांना त्याबाबत प्रतिउत्तर करत मी आणि देवेंद्र वेगळे आहोत, राजकारणात मला आणायचे नाही. असे म्हणत मलिकांवर टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT