Maharashtra News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Nashik Fire: नाशिकमधील इगतपुरीतील कारखान्याला भीषण आग

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव गावात एका कारखान्याला भीषण आग लागली आहे.

दैनिक गोमन्तक

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव गावात एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीमध्ये मोठी आग लागली आहे. कंपनीत केमिकल असल्याने स्फोट होत आहेत. आग लागल्यानंतर स्फोटाचे आवाज ऐकू लागले. आग लागलेल्या काही कंपनीत काही कामगार अडकले असल्याची माहिती आहे. आग प्रचंड मोठी असून महामार्गावरून देखील धूराचे लोट दिसत आहे.

आजूबाजूच्या कारखान्यांना कोणतेही नुकसान झाले नाही. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कामगारांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीची माहिती समजताच नाशिकचे पालक मंत्री दादा भुसे यांनी आपला औरंगाबाद दौरा रद्द केला.आगीत कंपनीतील काही कामगार, कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. आगी नेमकी कशी लागली, याचे नेमकं कारण समोर आले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

Imran Khan: भारतीय दिग्गजांचा पाकिस्तानला 'बाऊन्सर'! इम्रान खानच्या मदतीला धावले कपिल देव अन् सुनिल गावस्कर; सरकारकडे केल्या 'या' 3 मागण्या

Firing Video: रक्ताचा खेळ! LIVE सामन्यात अंदाधुंद गोळीबार, अनेकांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Donald Trump: "मी राष्ट्राध्यक्ष व्हावं असं त्याला वाटत नव्हतं..." अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एपस्टीनसोबतच्या मैत्रीवर ट्रम्प बोलले

SCROLL FOR NEXT