ATS Dainik Gomantak
महाराष्ट्र

पुण्यात ATS ची मोठी कारवाई; एकास अटक

सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आल्याचं स्पष्ट

दैनिक गोमन्तक

पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडून पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दापोडी परिसरातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील अतिरेकी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय असल्याने कारवाई केली आहे. या तरुणाचं नाव जुनेद मोहम्मद असं आहे तो 28 वर्षीय असल्याच ही स्पष्ट झालं आहे. या तरुणावर काश्मीर मधील अतिरेकी संघटनेकडून फंडींग झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर आज जुनेद मोहोम्मदला दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

या प्रकरणी पुणे दहशतवादी विरोधी संघटनेने दिलेल्या माहितीनूसार, गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने महिनाभरापुर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. मात्र हे पैसे त्याला कुठल्या कामासाठी देण्यात आले होते. उघड झाल नाही. राज्यात कारवायांसाठी काश्मीरच्या एका संघटनेने त्याला महिनाभरापुर्वी 10 हजार रुपये पाठवले होते. त्याच्या वैयक्तिक बँक खात्यात हे पैसे टाकण्यात आले होते. काही दिवसांपासून पुणे दहशतवादी विरोधी पथक आरोपीच्या मागावर होते. अखेर पुणे दहशतवादी विरोधी पथकाने आज मुसक्या आवळल्या आहेत.

जुनेद याला लष्कर-ए-तोयबासाठी काम केलं तर पैसे मिळत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कश्मिर संघटनेच्या संपर्कात आला असल्याची ही माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी जुनेद हा मुळ बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिग करण्यात आल्याचा पुणे दहशतवादी विरोधी पथकाचा आरोप आहे. जुनेद मौहम्मद त्यांच्या भावाबरोबर पु्ण्यातील दापोडी परिसरात राहत होता. अकोला दहशतवादी विरोधी पथकाकडून त्यांची चौकशी सुरु होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT