Raj Thackeray

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

'ठाकरे सरकार पडणार नाही', राज ठाकरेंना विश्वास

यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना म्हाडाच्या पेपर फुटीवरुन सरकारवर निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गाजत आहे. विरोधी पक्ष ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना म्हाडाच्या पेपर फुटीवरुन सरकारवर निशाणा साधला.

ठाकरे म्हणाले, 'राज्यात पेपर फुटीची प्रकरणे मागील काही दिवसांपासून गाजत आहेत. पेपर फुटीची ही पहिलीच वेळ नाही. मात्र फोडणारे अद्याप गायबच आहेत. दुसरीकडे निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षणांचा गोंधळ घातला जात आहे. कोरोना काळात पाच लाखाहून अधिक व्यवसायिकांनी देश सोडला, यावर मात्र कोणत्याही प्रकारची चर्चा केली जात नाही.'

राज ठाकरे पुढे म्हणाले, 'नोटाबंदी आणि लॉकडाऊनमुळे व्यवसायिकांनी देश सोडला. मात्र राज्यातील ठाकर सरकार अद्याप तरी पडणार नाही असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला. घोटाळ्याच्या नावाखाली कोणाच्याही घरात डोकावण्याची आम्हाला काही एक गरज वाटत नाही. नाशिक शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही काम केले.'

शिवाय, निवडणुकीच्या वेळी कामाच्या मुद्यावर जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत विकास तरी कसा होणार असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. देशातील आणि राज्यातील नेते निवडणुकीच्या काळात मतदारांना गृहीत धरतात. निवडणुकीच्या काळात मतदारांनी आपला राग दाखवला नाही तर या राजकारणी मंडळींना मतदारांच महत्त्व कसं काय समजणार, अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर प्रत्येकजण आपला पक्ष मोठा करण्यासाठी काम करत असतो. मात्र निवडणुकीच्या वेळी आम्ही युतीचं पाहू असं देखील राज ठाकरे यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait Of Hormuz: '20 लाख डॉलर डॉलर्स द्या, सुरक्षित मार्ग मिळवा...' इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा प्रसिद्ध; व्यापारी जहाजांच्या मानेवर स्फोटकांची तलवार

VIDEO: विराटचं नाव आलं अन् बाबरचं डोकं फिरलं! किंग कोहलीच्या 'फिनिशिंग' स्टाईलवरुन पत्रकाराची गुगली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

काय तो निर्णय अन् काय तो राग! भर मैदानात पडला रक्ताचा सडा, रनआऊटसाठी अंपायरची चाकू भोसकून हत्या; क्रिकेट टूर्नामेंटमध्ये थरार

8th Pay Commission: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार बक्कळ पैसा; CEA चे नवीन नियम जाहीर

Iran US Ceasefire: पाकड्यांची 'इंटरनॅशनल' फजिती! कॉपी-पेस्ट मेसेजवरुन शाहबाज शरीफ ट्रोल; इराण-अमेरिका शस्त्रसंधीचं क्रेडिट घेण्याची धडपड

SCROLL FOR NEXT