Chandrakant Patil Dainik Gomantak
महाराष्ट्र

...तर महाविकास आघाडी राज ठाकरेंना तुरुंगात डांबेल - चंद्रकांत पाटील

दैनिक गोमन्तक

राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत पुन्हा भोंगा आणि हनुमान चीलीसा मुद्यावरुन राज्य सरकारला सुनावलं आहे. यावरुन आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी सुरुच असून महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरे यांच्या खांद्यावरुन भाजप महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत असल्याचा सुर आळवते आहे. तर राज ठाकरे यांच्या समर्थनात भाजप नेते ही उतरले आहेत. (MahaVikas Aghadi Raj Thackeray will be jailed - Chandrakant Patil )

chandrakant patil

राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. तर १३ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिस बजावण्यात आल्या. मंगळवारी सायंकाळी राज यांनी पत्रक जारी करुन जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असं आवाहन केलं आहे.

मात्र या प्रकरणामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा उल्लेख करत वेगळीच शंका उपस्थित कतर या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय.चंद्रकांत पाटील यांनी पुढे बोलताना म्हटले आहे कि, हिंदुत्वाची मुस्कटदाबी करायचीच, हाच या सरकारचा अजेंडा आहे. या परिस्थितीत कोर्टानं आदेश दिलेले भोंगे काढा म्हणणाऱ्या राज ठाकरेंबाबतही वेगळं काय होणार ?,” असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी विचारलाय.

तसेच अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी, “बेकायदा भोंग्याच्या आवाजानं होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आक्षेप असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. हे भोंगे काढण्याचे आदेश न्यायालयानेही दिलेत. प्रसंगी न्यायालयाचा अवमान करू, पण हिंदुत्वाची मुस्कटदाबी करूच, अशी भूमिका मविआ सरकार घेईल आणि राज ठाकरेंनांही निश्चितच तुरुंगात डांबेल,” असंही म्हटलंय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT