National Games Goa 2023 Dainik Gomantak
महाराष्ट्र

National Games Goa 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची विक्रमी घोडदौड! दोनशे पदकांची कमाई

ट्रायथलॉन मिश्र रिलेत सुवर्णपदकाची कमाई

Kishor Petkar

National Games Goa 2023: ट्रायथलॉनमधील मिश्र रिलेत जिंकलेले सुवर्णपदक महाराष्ट्राचे ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील दोनशेवे पदक ठरले. गोव्यात सुरू असलेल्या स्पर्धेत पदकांचे द्विशतक नोंदविणारा महाराष्ट्र पहिला संघ ठरला.

मिरामार समुद्रकिनारी पार्थ मिरगे, संजना जोशी, कौशिक मालंदकर, मानसी मोहिते यांच्या संघाने महाराष्ट्राला (१ः५१.१९ से.) ट्रायथलॉन मिश्र रिलेत सुवर्णपदक जिंकून दिले. तमिळनाडूच्या (१ः५१.३६ से.). संघाला रौप्य, मध्य प्रदेशला (१ः५२.०० से.) ब्राँझपदक मिळाले. ट्रायथलॉनमधील वैयक्तिक प्रकारात रविवारी सुवर्णपदक जिंकलेल्या मानसी हिने सुमारे दोन मिनिटांची पिछाडी भरून काढताना महाराष्ट्राच्या विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला.

मानसीचे हे ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पाचवे सुवर्णपदक ठरले. ट्रायथलॉनमधील वैयक्तिक विजेतेपदाव्यतिरिक्त तिने मॉडर्न पेंटॅथलॉनमधील बायथल प्रकारातही तीन सुवर्णपदके जिंकली होती. महाराष्ट्राच्या पार्थ याने स्पर्धेत ट्रायथलॉन व मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये पाच सुवर्ण व एक रौप्यपदक मिळून एकूण सहा पदके जिंकली.

मेहुलीला सुवर्णपदक

मांद्रे येथील यश शूटिंग अकादमी रेंजवर महिलांच्या नेमबाजीत १० मीटर एअर रायफल प्रकारात पश्चिम बंगालच्या मेहुली घोष हिने सुवर्णपदक पटकावले. तिने २५३.७ गुणांची नोंद केली. हरियानाच्या नॅन्सी मंधोत्रा (२५१.०) हिला रौप्य, तर पश्चिम बंगालच्याच स्वाती चौधरी (२०७.८) हिला ब्राँझपदक मिळाले.

कॅनोईंग-कयाकिंगमध्ये मध्य प्रदेशचे वर्चस्व

शापोरा नदीत मंगळवारी कनोईंग-कयाकिंगमध्ये मध्य प्रदेशने वर्चस्व राखताना शालोम प्रकारात चार सुवर्णपदके जिंकली. शुभम केवत (पुरुष कयाक वैयक्तिक), भूमी बाघेल (महिला कयाक वैयक्तिक), विशाल वर्मा (पुरुष कॅनोई वैयक्तिक), रिना सेन (महिला कॅनोई वैयक्तिक) यांनी मध्य प्रदेशला सुवर्णपदके जिंकून दिली.

हॉकीत हरियाना अंतिम फेरीत

हॉकीत हरियानाने पुरुष व महिला गटात अंतिम फेरी गाठली. पेडे-म्हापसा येथे झालेल्या सामन्यात सोमवारी महिलांच्या उपांत्य लढतीत हरियानाने २-२ गोलबरोबरीनंतर शूटआऊटमध्ये पंजाबला २-० असे नमविले. दुसऱ्या उपांत्य लढतीत मध्य प्रदेशने गोलशून्य बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये झारखंडला २-१ असे पराभूत केले.

पुरुष गटात हरियाना व कर्नाटक यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल. उपांत्य फेरीत हरियानाने उत्तर प्रदेशला १-० असे, तर कर्नाटकने चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राला ५-४ असे पराजित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: ‘वुमन सेफ्टी अँड सिनेमा’ सत्रात मान्यवरांची ‘सेफ बॅटिंग’! 'पॉवर प्ले आहे पण..', भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT