Weather Update Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

देशातला हवामानाचा मुड बदलतोय, मात्र महाराष्ट्रात उष्णतेचे वारे वाहतायत

IMD ने विदर्भात 19 ते 21 मे या कालावधीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

दैनिक गोमन्तक

ऐकीकडे देशात मान्सुनचे वेध लागले असतानांच दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र (Maharashtra) कडक उष्णतेचा काळ सुरूच आहे. IMD ने विदर्भात 19 ते 21 मे या कालावधीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update)

यासोबतच सर्वांना उन्हापासून संरक्षण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्याच्या इतर भागात सामान्य उष्णता देखील अपेक्षित आहे. याशिवाय काही ठिकाणी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी अकोल्यात 44.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात मान्सुन वारे अरबी समुद्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबई

गुरुवारी मुंबईत कमाल तापमान 33 तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आकाशात हलके ढग दिसून येऊ शकतात. 'खराब' श्रेणीत हवेचा दर्जा निर्देशांक 242 वर नोंदवला गेला आहे.

पुणे

पुण्यात कमाल तापमान 38 तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. सकाळी हवामान स्वच्छ असणार आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण देखील राहील. 'खराब' श्रेणीत हवेचा दर्जा निर्देशांक 249 वर नोंदवला गेला आहे.

नागपूर

नागपुरात कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, वायु गुणवत्ता निर्देशांक 110 आहे, जो 'मध्यम' श्रेणीत येईल.

नाशिक

नाशिकमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 127 एवढा आहे.

औरंगाबाद

औरंगाबादमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. सकाळी हवामान स्वच्छ असणार आहे. दुपारनंतर हलके ते ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे तसेच हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीतील 137 एवढा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोलवाळमध्ये टॅक्सी चालकांची गर्दी! मोपा विमानतळावरील 'वसुली' विरोधात आंदोलन; 210 रुपये शुल्कामुळे संतापाची लाट

Dhirio in Colva: सुरावलीत पुन्हा धीरियोचा थरार, पोलिसांकडून FIR दाखल; Viral Video वरुन चर्चा..

Savoi Verem: झुळझुळ वाहणारे शीतल झरे, बागायतींनी नटलेला परिसर; मांडवीच्या कडेवर वसलेला गाव 'सावईवेरे'

Goa History: ‘पोर्तुगिजांनो चालते व्हा'! डॉ. गायतोंड्यांना अटक केली, 17 फेब्रुवारी 1955ला अनेक सत्याग्रही म्हापशाला जमा झाले..

Nightclubs In Goa: गोवेकरांना मारक ठरू शकणारे 'नाइटक्लबांचे जाळे' तोडून टाकावेच; गोव्याचे अनिष्ट गोष्टीपासून रक्षण करावे..

SCROLL FOR NEXT