Sambhaji Bhide dainik gomantak
महाराष्ट्र

Bhide Guruji Notice: भिडे गुरूजींना महिला आयोगाची दुसऱ्यांदा नोटीस; उत्तर न दिल्यास कारवाई

कपाळावर टिकली लावली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास दिला होता नकार

गोमन्तक डिजिटल टीम

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) एका महिला पत्रकाराला 'कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन' असे वक्तव्य केल्याने वादात सापडले आहेत. संभाजी भिडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मंत्रालयात भेटून आल्यानंतर, त्यांनी एका महिला पत्रकाराला प्रतिक्रिया देण्यास नकार देताना हे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर महिला आयोगानं संभाजी भिडे यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. याचे उत्तर न दिल्यास पुढील कार्यवाही केली जाईल असे महिला आयोगाच्या वतीने म्हटले आहे.

संभाजी भिडे यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये काय म्हटले आहे?

कपाळावर टिकली लावली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भुमिकेचा खुलासा सादर करण्याचे निर्देश उपरोक्त पत्राद्वारे आपणास देण्यात आले आहेत. तथापी आपल्याकडील खुलासा अद्याप प्राप्त झाला नाही. पत्र प्राप्त झाल्यापासून दोन दिवसांत आपले उत्तर मिळेल, अन्यथा आपले काहीएक म्हणणे नाही असे गृहीत धरून एकतर्फी निर्णय घेण्यात येईल व पुढील कार्यवाही करण्यात येईल.

दरम्यान, यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी महिला आयोगाच्या वतीने संभाजी भिडे यांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीला भिडे यांच्याकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने आयोगामार्फत दुसऱ्यांदा भिडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. भिडे यांनी टिकली वरून केलेल्या वक्तव्यबाबत त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: आरोपांची शिडी, परतीची वाट

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT