Sindhudurg News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sindhudurg News: भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क सिंधुदुर्गात

केसरी फणसेवाडी येथे सुरू होणार के एस आर ग्लोबल ॲक्वेरिअम: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

Ganeshprasad Gogate

Sindhudurg News:

निसर्गाने समृद्ध असलेला सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त असे इतर उपक्रम इथे राबवले जात आहेत.

जिल्ह्यातील अनेक कुटुंबांची उपजीविका पर्यटन क्षेत्रावरच अवलंबून असून जिल्ह्यावासीयांसाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला असून या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.०० वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधूदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

फिश थीम पार्क बद्दल बोलताना पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले की कोकणात पर्यटनाला उत्तम संधी आहे येथील पर्यटन जास्तीत जास्त विकसित करण्याचा आपले उद्दिष्ट आहे. यामध्ये विविध प्रकारचे रंगीत मासे तसेच गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासे, देशविदेशातील माशांच्या प्रजाती यांचा या फिश थीम पार्कमध्ये समावेश आहे.

याचा फायदा कोकणवासियांना तसेच महाराष्ट्रातील सर्वांना होणार आहे. विशेष म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना यांचा फायदा मिळणार आहे. या फिश थीम पार्कचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

या फिश थीम पार्क मध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे.

या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार असून गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पहावयास मिळणार आहेत, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT