Khalapur Landslide Dainik Gomantak
महाराष्ट्र

Khalapur Landslide: इर्शाळवाडीवर काळाचा घाला! दरड कोसळल्याने संपूर्ण वस्तीसह 48 कुटुंबे ढिगाऱ्याखाली

Irshalwadi Landslide: मध्यरात्री झालेल्या अपघातानंतर बचावकार्य सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Ashutosh Masgaunde

Irshalwadi Village in Khalapur trapped under landslide: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शालवाडी गावात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका वस्तीवर दरड कोसळली.

रात्री झोपेत असताना ही घटना घडल्यामुळे अनेकांना स्वताला वाचवता आले नाही. त्यामुळे ढिगाऱ्यात 48 कुटुंबातील 120 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मध्यरात्री झालेल्या अपघातानंतर बचावकार्य सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच, एकूण 27 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे.

या ठिकाणी अनेक बचाव पथके काम करत आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून इतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

दुसरीकडे, अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्राथमिक माहितीनुसार गावातील 90% भाग ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे. येथे 30 ते 35 आदिवासींच्या घरांची मोठी वस्ती होती.

या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. 120 हून अधिक लोक अडकल्याची भीती आहे.

आतापर्यंत बचाव पथकाला एक महिला आणि दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे. माती अजूनही पडत असल्याने. त्यामुळे बचाव कर्मचार्‍यांनाही धोका आहे.

अपघातासाठी नियंत्रण कक्ष सज्ज

खालापूर पोलीस स्टेशनने हदित चौक इर्शाळवाडी येथे तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. यामध्ये एक अधिकारी तैनात करण्यात आला असून त्याचा मोबाईल क्रमांक 8108195554 आहे.

बचाव कार्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती

जिल्हाधिकारी दत्तात्रेय नवले आणि सर्जेराव सोनवणे यांना अनुक्रमे वैद्यकीय मदत आणि बचाव कार्यासाठी विशेष अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

घटनास्थळी चार रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. आरएच चौकात आरोग्य अधिकारी आणि चार डॉक्टरांसह चार रुग्णवाहिका सज्ज आहेत.

९० टक्के घरे उद्ध्वस्त

प्राथमिक माहितीनुसार या भागातील ९० टक्के घरे उद्ध्वस्त झाली असून मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे.

युद्धपातळीवर मदत पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. मात्र जोरदार वाऱ्यामुळे काही दगड अजूनही वरून खाली येत आहेत.

त्यामुळे बचाव पथकासाठीही धोका निर्माण झाला आहे. मात्र अडकलेल्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

तहसीलदार आयुब तांबोळी आणि त्यांचे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि अनेक सामाजिक कार्य मदत पथके आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

लोक घाबरून जंगलाकडे धावले

अपघातानंतर काही लोक घाबरले आणि त्यांनी जंगलाकडे धाव घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

आपत्कालीन बचाव पथकाच्या सदस्याने सांगितले की लोक परत आल्यानंतरच आम्हाला या भूस्खलनात किती लोक अडकले आहेत याची अचूक माहिती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT