Mumbai-Goa Highway  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाची मंत्र्यांकडून पाहणी, गणेशोत्सवात कोकणवासीयांचा प्रवास सुकर होणार

पनवेल ते इंदापूर पहिला टप्पा गणेशोत्सवापुर्वी होणार

गोमंतक ऑनलाईन टीम

Mumbai Goa Highway: महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. त्यांनी पळस्पे फाटा, वाखण, इंदापूर-कासू रस्ते आणि घाट बांधकामाच्या स्थितीचा आढावा घेतला.

पनवेल ते इंदापूर मार्गाचा पहिला टप्पा हा गणेशोत्सवाच्या पूर्वी पूर्ण होऊन एक मार्गिका सुरू होईल तर डिसेंबर 2023 अखेर पर्यंत पूर्ण मुंबई-गोवा महामार्ग सुरळीतपणे सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यामुळे गणेशोत्सवाआधी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

हायवेच्या कामातील सर्व अडथळे लवकरात लवकर सोडवून हा महामार्ग वेळेत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रविंद्र चव्हाण यांच्या या पाहणी दौऱ्याला पनवेल येथून सुरवात झाली होती तर झारप येथे दौऱ्याची सांगता झाली.

भर पावसात अधिकाऱ्यांसह चव्हाण यांनी कामाची पाहणी केली. अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम आता सर्वांशी समन्वयातून केले जात आहे. गणेशोत्सवापुर्वी एक मार्गिका कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यावर भर आहे. हे सिंगल लेनचे काम 100 टक्के पूर्ण होईल.

पनवेल ते इंदापूर हा 42 किमीचा पहिला सिंगेललेन सुस्थितीत आहे. 12 किमीमधील सिंगल लेनचे व्हाईट टॉपिंग झालेले आहे. उरलेलं काम गणपतीच्या अगोदर पूर्ण होईल. उरलेला कासूपासून 42 किमीचा रस्ता खराब आहे. त्याचेही काम लवकर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा वाहतुकीसाठी सुरु करण्याच्या दृष्टीने निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. कशेडी घाटातून दोन वर्ष बोगद्याचे काम सुरु होते. त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT