Supriya Sule And Sharad Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सुप्रिया सुळे यांची भविष्यवाणी खरी ठरली! शरद पवारांच्या निर्णयानंतर...

Manish Jadhav

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

'लोक माझे सांगाती' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. त्यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याची माहिती दिली.

अध्यक्षपद सोडल्याच्या वृत्ताने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. जून 1999 मध्ये काँग्रेसपासून फारकत घेऊन पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

सुप्रिया सुळे यांनी ही भविष्यवाणी केली होती

शरद पवार यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नुकतेच येत्या 15 दिवसांत दोन राजकीय भूकंपाचे संकेत दिले होते.

सुप्रिया म्हणाल्या होत्या की, 'दोन राजकीय भूकंप येतील', एक नवी दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात.

आता सुळे यांची एक भविष्यवाणी खरी ठरल्याचे मानले जात आहे, जे महाराष्ट्रात घडले. आता दुसरा भूकंप कधी येतो हे पाहावे लागेल.

दुसरीकडे, भाजपशी हातमिळवणी करुन त्यांचे पुतणे अजित पवार नवा 'राजकीय भूकंप' घडवून आणणार असल्याच्या बातम्या येत असतानाच शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पवारांनी ते अंदाज फेटाळून लावले.

अजित पवारांच्या वक्तव्यात तथ्य नाही, त्यांनी आजपर्यंत आमदारांची एकही बैठक बोलावली नाही, राष्ट्रवादीला मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण एकदिलाने काम करत आहोत, असे शरद पवार म्हणाले होते.

'सार्वजनिक जीवनातून निवृत्त होत नाही'

पवार पुढे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की, 'मी अध्यक्षपदावरुन पायउतार होत असलो तरी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होत नाही. 'सतत प्रवास' हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

सार्वजनिक कार्यक्रमात, सभांमध्ये सहभागी होत राहीन. मी पुणे, मुंबई, बारामती, दिल्ली किंवा भारताच्या इतर कोणत्याही भागात असो, मी नेहमीप्रमाणेच तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध आहे.'

MVA च्या निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावली

चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, संरक्षण आणि केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काम केलेल्या पवारांनी 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी (MVA) सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वैचारिकदृष्ट्या भिन्न असलेल्या शिवसेनेला एकत्र आणले. आता पवारांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर एमव्हीएच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT