Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय संकट पाहता बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना कोणाची? पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाला मिळणार या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि पक्षाचे ‘सुप्रिमो’ उद्धव ठाकरे आमनेसामने आले आहेत. (Shivsena For Party Symbol)
दरम्यान, बंडखोर आमदारांच्या गटातील आमदार भरत गोगावले यांची नवे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य व्हीपची नियुक्ती करुन शिंदे कॅम्पला पक्षाच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे आणि खरी शिवसेना (Shiv Sena) आपल्याच पाठिशी असल्याचे एकनाथ शिंदे यांना दाखवून द्यायचे आहे. (Shiv Sena News)
तसेच, शिंदे कॅम्पने शिवसेनेचे 37 आणि नऊ अपक्षांसह 46 आमदारांचा (MLA) पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. 20 जूनपासून गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांनी शिंदे यांना पुढील निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. म्हणजेच, गुवाहाटीत तळ ठोकून बसलेल्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एकमताने गटनेतेपदी निवड केली आहे. (Maharashtra Political News)
दुसरीकडे, ठाकरे गटही शांत बसलेला नाही. विधानसभेत शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी एका पत्राद्वारे पक्षाच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना बुधवारी सायंकाळी 5 वाजेपूर्वी वर्षा निवासस्थानी हजर राहण्याचे आदेश दिले होते. एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे हा आदेश बेकायदेशीर असल्याचे म्हटले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॅम्पने विधानसभेच्या उपसभापतींकडे याचिका दाखल करुन एकनाथ शिंदे यांच्यासह 12 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. शिंदे यांच्याशिवाय शिवसेनेने प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, संदीप भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी यादव, अनिल बाबर, बालाजी देवदास आणि लता चौधरी यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.
तसेच, दुसऱ्या रणनीतीत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरुन हटवून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्याचा नवा आदेश जारी केला. ही नियुक्ती नाकारताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, 'पक्षाने आम्हाला नोव्हेंबर 2019 मध्ये (सरकार स्थापन करताना) विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून घोषित केले होते. आणि मी अजूनही विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत.'
शिवाय, महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकीय पेचप्रसंगावर लक्ष ठेवणाऱ्या जाणकारांचे म्हणणे आहे की, या सगळ्या राजकीय घमासानामध्ये या दोन गटांपैकी कोणाकडे पक्षाचे निवडणूक चिन्ह असणार हा प्रश्नच आहे. मात्र, पक्षात मतविभागणी होणार हे निश्चित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र पक्षाचे चिन्ह कोणाकडे असेल, हा मोठा प्रश्न आहे.
दरम्यान, शिवसेना पक्ष सध्या दोन गटामध्ये विभागला गेला आहे. जेव्हा संसदेचे किंवा विधानसभेचे अधिवेशन चालू असते आणि त्याचदरम्यान काही आमदार पक्ष सोडतात, अशा परिस्थितीत पक्षांतर विरोधी कायदा लागू होतो. अशा परिस्थितीत निर्णय घेण्याचा अधिकार स्पीकरला असतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.