Maharashtra Political Crisis Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाच्या बंडखोरीपासून ते सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील महत्वाचे मुद्दे

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर होणार असुन जाणून घेउया सुप्रीम कोर्टात काय घडले.

दैनिक गोमन्तक

राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता घटनापीठासमोर होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी करता येणार नाही असे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी होणार होती. पण संबंधित खंडपीठासमोर सुनावणी होणार नसल्याने शिवसेनेने सरन्यायाधीशांकडे धाव घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेऊ नये असे आदेश दिला. (Maharashtra Political Crisis News)

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. मात्र त्याआधी शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाई सुरू केली होती. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड केली. त्याला आव्हान देत शिंदे गटाने शिवसेनेच्या कारवाईच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर शिवसेनेच्यावतीनेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.

* सुप्रीम कोर्टात आज घडले?

  • विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या बाबत व इतर याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. पण आज ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्यावतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली.

  • त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत कारवाई न करण्याचे निर्देश दिले.

  • सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी खंडपीठ तयार करण्यासाठी काही वेळ लागणार असल्याचेही सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी म्हटले.

  • मागील महिन्यात 27 जून रोजी न्या. सूर्य कांत आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

  • त्यावेळी विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत 12 जुलैपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते.

  • शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर ठेवले, सिब्बल म्हणाले की, उद्या अपात्रतेबाबतचा मुद्दा विधानसभेत ऐकला जाईल. जर कोर्टानं आज सुनावणी घेतली नाही तर विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेऊ शकतात.

  • जोपर्यंत यावर कोर्ट सुनावणी करत नाही जोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी कोर्टाकडे केली.

  • यावर कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कुठलाही निर्णय न घेण्याबाबत निर्देश दिले.

  • सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी म्हटले की, या प्रकरणाची सुनावणी उद्या होऊ शकत नाही. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी घटनापीठ तयार करावे लागणार. त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी करण्यास वेळ लागणार आहे.

सुप्रीम कोर्टात कोणत्या याचिकांवर सुनावणी पुढे ढकलणार?

  • 16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाचे आव्हान

  • एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेच निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला शिवसेनेचं आव्हान

  • विधानसभा अध्यक्ष निवडीची अनुमती देण्याच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका

  • विश्वासदर्शक ठरावाचे निर्देश देण्याच्या राज्यपाल कोश्यारी यांच्या आदेशालाही शिवसेन's आव्हान

  • एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदी कायम ठेवून चौधरींची नियुक्ती रद्द करण्याला आव्हान

  • एकनाथ शिंदे यांना गटनेते आणि गोगावले यांना प्रतोदपदी निवडीला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेनेचे आव्हान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT