Dilip Walse-Patil, Minister of Home Affairs of Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिपाई, हवालदार होणार सहायक पोलिस उपनिरीक्षक

पदोन्नतीचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलिस शिपाई, हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक यांना होणार आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यातील अनेक पोलिस हवालदारांचे पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. हा शासन निर्णय शुक्रवारी मंजूर झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील पोलिस (Police) दलाच्या बळकटीकरणास आणखी चालना मिळणार आहे. सोबतच गुन्ह्यांची उकल होण्यास व गुन्हे रोखण्यास मदत होईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी व्यक्त केला आहे. (Dilip Walse-Patil, Minister of Home Affairs of Maharashtra)

राज्यातील अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलिस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहोचता येत नव्हते. त्यांना पदोन्नतीचा लाभ देऊन अधिकारी होता यावे या दृष्टिकोनातून काहीदिवसांपूर्वी हा प्रस्ताव गृहविभागाने तयार केला होता. या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिल्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. (Sub Inspector)

या निर्णयामुळे पोलिस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवाकालावधीत पदोन्नतीच्या तीन संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली.

पदोन्नतीचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलिस शिपाई, हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक यांना होणार आहे. यामुळे पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. तसेच पोलिस दलास सद्यःस्थितीत प्रत्यक्ष कामकाजासाठी मिळणाऱ्या मानवी दिवसांमध्येही मोठी वाढ होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मनोज परब असे कोण आहेत, ज्यांनी कॉंग्रेसला उपदेश करावा'? चोपडेकर यांचा हल्लाबोल; जनतेची दिशाभूल केल्याचे आरोप

Job Scam: सांगितले हॉंगकॉंग नेले कंबोडियात! नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; मर्चंट नेव्हीच्या नावाखाली उकळले 8 लाख

Goa Education: 11 वीच्‍या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! उच्च माध्‍यमिक विद्यालये बनवणार प्रश्नपत्रिका; प्रश्‍‍नांची बँक येणार वापरात

माणुसकीची ‘जीत’! मदुराईहून चेन्नईला हेलिकॉप्टरने नेले हृदय, गोव्यातील व्यक्तीला दिला पुनर्जन्म; आमदार आरोलकरांची कार्यतत्परता

Horoscope: वर्षाचा शेवटचा सप्ताहाचा प्रारंभ! 'या' राशींना मिळणार प्रगतीची नवी संधी, वाचा तुमचे भविष्य

SCROLL FOR NEXT