Maharashtra Police  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Police : ‘पत्रादेवी’वर महाराष्ट्र पोलिसांची नाकाबंदी; दारूची तस्करी रोखण्यासाठी तपासणी

Maharashtra Police : संयुक्त मोहीम, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिस मोठ्या प्रमाणात गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करत असल्याचे चित्र शनिवारी (ता.१८) सायंकाळी दिसून आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Maharashtra Police : मोरजी, पत्रादेवी चेकनाक्यावरून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याच अनुषंगाने थेट पत्रादेवी-गोव्याच्या हद्दीत ज्या ठिकाणी मोपा हद्दीतला पत्रादेवी पोलिस चेकनाका आहे.

त्या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिस मोठ्या प्रमाणात गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करत असल्याचे चित्र शनिवारी (ता.१८) सायंकाळी दिसून आले.

याविषयी महाराष्ट्र पोलिस निरीक्षक पवार यांच्याशी संपर्क साधला असता गोवा आणि महाराष्ट्र पोलिसांचे चांगले संबंध राहावेत. त्यासाठी संयुकरतीत्या ही मोहीम राबवली जात आहे. वेळप्रसंगी गोव्यातील पोलिस महाराष्ट्र हद्दीमध्ये येऊन महाराष्ट्रातील वाहने गोव्यात जात असतील आणि एखाद्यावेळी संशय असेल तर तेसुद्धा तशा प्रकारची तपासणी करू शकतात, असे सांगितले.

मागच्या काही महिन्यांपासून गोव्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत होती. पत्रादेवी चेकनाक्यावर न सापडणारी वाहने थेट सिंधुदुर्गातील बांदा, इन्सुली, आरोस या भागात अडवली जात होती आणि लाखो रुपयांची दारू हस्तगत करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पोलिस करत होते.

मात्र, पेडणे अबकारी विभागाकडून तशा प्रकारची कारवाई का होत नव्हती, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांनी गोव्याच्या हद्दीमध्ये येऊन मागच्या तीन दिवसांपासून ही नाकाबंदी सुरू केलेली आहे. केवळ दुचाकी नव्हे तर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असल्याचे चित्र पत्रादेवी चेकनाक्यावर प्रत्यक्ष भेट दिली असता दिसून आले.

पेडणे ‘अबकारी’ला मिळाली विश्रांती

महाराष्ट्र पोलिसांनी पत्रादेवी चेकनाक्यावर ज्या पद्धतीने नाकाबंदी केली होती आणि वाहनांची तपासणी केली त्या पार्श्वभूमीवर पेडणे चेकनाक्याला मात्र थोड्या प्रमाणात विश्रांती मिळाली. चेकनाक्यावर येण्यापूर्वीच ज्या ठिकाणी पोलिस नाका आहे.

त्या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिस आपल्या टीमसोबत सज्ज होते. त्यामुळे अबकारी नाक्यावर वाहने तपासण्याची गरज भासली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shipyard Blast: 'नुकसान भरपाई द्या, मगच मृतदेह ताब्यात घेऊ'; शिपयार्ड स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश, Video

Guleli IIT Protest: 5 वर्षांनंतर केस निकाली!गुळेली आंदोलन प्रकरणी 50 जणांची निर्दोष मुक्तता; बोरकर, परब यांचाही समावेश

Narkasur Celebration: नरकासुर प्रदर्शनावेळी पणजीत वाढला दणदणाट! आवाज 100 डेसिबलपेक्षा जास्त; नागरिकांच्या तक्रारी

Ravi Naik: स्मृतींचा जागर, आठवांचा गहिवर! 'रवीं'ना आदरांजली; मुख्‍यमंत्री, मंत्री, आमदार, हितचिंतकांचे अभिवादन

Diwali in Goa: नरकासुर वध, पाच प्रकारचे 'पोहे'; गोव्याची दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा पारंपरिक विजयोत्सव

SCROLL FOR NEXT