Maharashtra ministers charged with wielding sword Dainik Gomantak
महाराष्ट्र

तलवार चालवल्याप्रकरणी महाराष्ट्रातील मंत्र्यांवर गुन्हा दाखल

भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली होती तक्रार

दैनिक गोमन्तक

Maharashtra Crime News : सार्वजनिक कार्यक्रमात तलवारीचा वापर केल्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख आणि इतरांविरुद्ध सोमवारी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी रात्री काँग्रेस नेते आणि कवी इम्रान प्रतापगढ़ी यांचे स्वागत करण्यासाठी बद्रातील रंग शारदा भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तिथे ही घटना घडली.

शस्त्रास्त्र आणि पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शेख व गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्यासह इम्रान प्रतापगढी तलवारी फिरवताना दिसत आहेत. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी इम्रान प्रतापगढ, दोन मंत्री आणि इतरांविरुद्ध बॉम्बे पोलीस अॅक्ट, आर्म्स अॅक्ट या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

भाजप (BJP) नेते मोहित कंबोज यांनी दावा केला की, त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रतापगढी आढावा बैठकीला आले होते. माहितीनुसार, महाराष्ट्र काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक घेण्यासाठी इम्रान प्रतापगढी मुंबईत पोहोचले होते. गायकवाड हे मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शेख हे मालाड (पश्चिम) विभागाचे प्रतिनिधीत्व करतात. दोन्ही मंत्री काँग्रेसचे आहेत, जे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकारमधील तीन घटकांपैकी एक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Double Century: 28 षटकार, 53 चेंडू अन् 204 धावा! 15 वर्षीय 'वैभव'चा ऐतिहासिक धमाका, झळकावले सर्वात वेगवान द्विशतक; वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय

Surya Gochar 2026: वर्ष संपण्यापूर्वी 'या' 5 राशींची चांदी! सूर्य गोचरने बदलणार दिवस; होणार मोठा धनलाभ

Goa Politics: पर्रीकरांचा करिष्मा नाही, विरोधकांची एकजूटही नाही; गोव्यात भाजपपुढे सत्तेचे आव्हान

Pakistan Sindh Protest: कराचीच्या रस्त्यांवर 'सिंधुदेश'चे नारे! असीम मुनीरच्या विरुद्ध उसळला जनक्षोभ; पाकिस्तानच्या विभाजनाची चाहूल?

Satish Timbale Trophy: बंद पडलेल्या शालेय क्रिकेटला पणजी जिमखान्याची संजीवनी; 16 वर्षांखालील 8 संघ भिडणार

SCROLL FOR NEXT