Maharashtra Lok Sabha Elections 2024 Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Elections 2024: राज्यातील 48 मतदारसंघात कोण मैदानात? प्रमुख लढती कोणत्या, जाणून घ्या...

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

Manish Jadhav

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. तर दुसरीकडे, विरोधकांनी एकजूट दाखवत मोदींचा हा विजयी रथ रोखण्साठी जोरदार तयारी सुरु केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. महाविकास आगाडी आणि भाजपप्रणित महायुती यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे तणावग्रस्त दिसत होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. मात्र अखेर भाजपने शिवसेनेला कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याचे मान्य केले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (भाजप) यांनी ही घोषणा केली. मात्र, शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर सध्या तुरुंगात असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी डॉ. शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याचा ठराव मंजूर केला आहे.

दुसरीकडे, कल्याणच्या जागेवरुन सत्ताधारी महायुती मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात काही अलबेल नाही अशा चर्चा सुरु होत्या. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ अंबरनाथमध्ये शिवसेनेचा (शिंदे) आमदार आहे, तर उल्हासनगर, कल्याण पूर्व आणि डोंबिवलीमध्ये भाजपचे आमदार आहेत, या आधारावर भाजपने उमेदवार उभे करण्याचा आग्रह धरला. मुंब्रा-कळव्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) तर कल्याण ग्रामीण मनसेकडे होती.

ठाणे मतदारसंघ

दरम्यान, डॉ. शिंदे यांना शेजारच्या ठाणे मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी असे भाजपचे म्हणणे होते. तथापि, मुख्यमंत्र्यांना आपले सुपुत्र ठाण्याच्या जागेवरुन जिंकणार नाहीत असे वाटत होते. कारण शिवसेना (UBT) 2019 मध्ये राजन विचारे निवडून आलेली जागा राखण्यासाठी करो या मरोच्या मूडमध्ये होते. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30 हून अधिक आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. दरम्यान, 48 पैकी 33 जागांवर रणधुमाळी स्पष्ट झाल्याने पुन्हा एकदा राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे. उत्तर प्रदेश (80) नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहेत.

15 जागांवर अनिश्चितता

मात्र, भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचा समावेश असलेल्या सत्ताधारी महायुतीने अद्याप आठ जागांवर उमेदवारी जाहीर न केल्याने आणि महाविकास आघाडीने तब्बल 15 जागांवर उमेदवार जाहीर न केल्याने अद्याप स्थिती स्पष्ट झालेली नाही.

दुसरीकडे, ज्या 33 मतदारसंघांमध्ये चित्र स्पष्ट आहे, त्यामध्ये मुंबई ईशान्य मतदारसंघाचा समावेश आहे जिथे शिवसेनेचे (UBT) उमेदवार संजय दिना पाटील, जे पूर्वी अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, ते भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्याशी लढत आहेत. भाजपने विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा परफॉर्मन्स चांगला असतानाही त्यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला.

मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघ

दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे (शिंदे) आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेनेचे (यूबीटी) अनिल देसाई यांच्यात मुख्य लढत होणार आहे. देसाई यापूर्वी राज्यसभेचे खासदार होते. भाजपने उत्तर मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. परंतु महाविकास आघाडीने अद्याप त्यांच्या विरोधात उमेदवार निश्चित करणे बाकी आहे.

मुंबई- उत्तर पश्चिम मतदारसंघ

मुंबई उत्तर-पश्चिममध्ये सेनेने (यूबीटी) विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचा सुपुत्र अमोल यांना तिकीट दिले असून ते आता शिंदे यांच्यासोबत आहेत. दक्षिण मुंबईत उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. परंतु ही जागा जिंकण्यासाठी उत्सुक असलेल्या भाजपने ज्येष्ठ नेते मंगल प्रभात लोढा यांना उमेदवारी द्यायची की सभापती राहुल नार्वेकर यांना उमेदवारी द्यायची हे अद्याप ठरलेले नाही.

शिर्डी, दिंडोरी, जळगाव मतदारसंघ

शिर्डी या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे पुन्हा निवडून येण्यासाठी इच्छुक आहेत. तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचौरे तिकीट मिळवण्यासाठी धडपडत आहेत. दिंडोरीमध्ये भाजपचे उमेदवार भारती पवार आणि राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार भास्कर भगरे यांच्यात लढत आहे, तर जळगावमध्ये भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्यात लढत होत आहे.

नंदुरबार मतदारसंघ

नंदुरबारच्या आदिवासी मतदारसंघात भाजपच्या उमेदवार हिना गावित यांची काँग्रेसचे उमेदवार गोपाळ पाडवी यांच्यात लढत होत आहे. तर मावळमध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गटाचे) उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय वाघरे, शिरुरमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढाळराव पाटीलविरुद्ध शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यात लढत होणार आहे. दुसरीकडे, बारामतीत शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होत आहे.

अहमदनगर मतदारसंघ

अहमदनगर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील आणि शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात लढत होणार आहे. तर कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराजविरुद्ध शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांच्यात लढत होणार आहे. हातकणंगलेमध्ये शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील मानेविरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात लढत होणार आहे. सांगलीत भाजपचे उमेदवार संजयकाका पाटीलविरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील, सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणती शिंदेविरुद्ध भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे आणि उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांच्यात लढत होणार आहे.

अकोला मतदारसंघ

अकोला मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर हे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांच्या विरोधात आहेत.

बुलढाणा

बुलढाण्यात शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यात लढत होणार आहे. तर अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार नवनीत राणाविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे, वर्ध्यात भाजपचे उमेदवार रामदास तडसविरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे, रामटेकमध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यात लढत आहे. राजू पारवेविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे, चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होणार आहे.

नागपूर

नागपुरात भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे, भंडारा- गोंदियामध्ये भाजपचे उमेदवार सुनील मेंढेविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पाटोळे, गडचिरोली- चिमूरमध्ये भाजपचे उमेदवार अशोक नेटेविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान आणि यवतमाळ वाशिममध्ये शिवसेनेचे उमेदवार सुनील मेंढेविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार विजय ठाकरे यांच्यात सामना आहे.

मराठवाडा

मराठवाड्यात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याशी होणार आहे, धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यात लढत होणार आहे. त्याचबरोबर परभणीमध्ये भाजपकडून महादेव जानकरविरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव, नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकरविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण, लातूरमध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारेविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव काळगे आणि हिंगोलीत शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकरविरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार एन.बी.टी. पाटील यांच्यात लढत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 24 November 2024: केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस,कामाच्या ठिकाणी स्थिती उत्तम असेल; जाणून घ्या आजचे भविष्य

Goa Trip: तर आता कन्फर्म कराच!! डिसेंबर जवळ आलाय; गोव्याला फिरायला जायचं आहे ना?

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

SCROLL FOR NEXT