Maharashtra Legislative Assembly winter session will start from 7 December  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून

महाराष्ट्र विधिमंडळाचे (Maharashtra Legislative Assembly ) यंदाचे तिसरे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 7 डिसेंबरपासून प्रस्तावित आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र विधिमंडळाचे (Maharashtra Legislative Assembly ) यंदाचे तिसरे हिवाळी अधिवेशन (Winter Session) नागपूर (Nagpur) येथे 7 डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. याबाबत तयारीचे नियोजन करण्यासाठी सोमवारला सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक देखील पार पडली असल्याचे समजत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. (Maharashtra Legislative Assembly winter session will start from 7 December)

या अधिवेशनासाठी पुढील आठवड्यात मुंबईत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे. त्यादृष्टीने आजच्या बैठकीत तयारीसाठी सर्व विभागाने केलेल्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला आहे . यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.

नागपुरात या हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक असणार आहे. याशिवाय, दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्टही करावी लागणार आहे. कोरोना अनुषंगाने या हिवाळी अधिवेशनात प्रवेश मर्यादाही असणार आहे. त्यामुळे विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही तर त्यां साऱ्यांसाठी आवश्यक व्यवस्था परिसरात करण्यात याव्यात अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. याशिवाय सभागृहामध्ये ‘सोशल डिस्टंसिंग’ राखायचे असल्यामुळे सदस्यांना एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Crime: 2 महिला, एका बालिकेची निर्घृण हत्‍या! एक मृत्‍यू संशयास्‍पद; महिलांसोबतच्या वाढत्या घटनांनी डिचोली हादरले

Fishermen Pele: 'चर्चवरील हल्ल्याने मन व्यथित झाले'! मच्छीमार पेलेने व्यक्त केली खंत; दोषींवर कारवाईची केली मागणी

पर्यटकांसाठी महत्वाची अपडेट! गोव्यातून परतीचा प्रवास महागला; तिकीटदर दुपटीपेक्षा जास्त; वाढीव रकमेमुळे कोलमडले बजेट

Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपतींनी मुर्मूंनी केला ‘वाघशीर’मधून प्रवास! ‘INS हंसा’ तळावर भव्य स्वागत; स्पेक्ट्रमची केली पाहणी

देशाला हादरवून सोडणाऱ्या 2025 मध्ये गोव्यात घडलेल्या तीन घटना

SCROLL FOR NEXT