मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली असून, राज्यातील काही भागामध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. येत्या शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भ, कोकणातील (Konkan) काही ठिकाणी, तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रासह (Maharashtra) मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असल्याची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ओडीशाच्या (Odisha) किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. मॉन्सूनची आस लागून असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील बिकामनेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय आहे. त्याचबरोबर वायव्य मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या पूर्व परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा एकदा सक्रीय होईल अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यातच परिणाम म्हणून महाराष्ट्रासह पूर्व आणि मध्य भारतात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 22 सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्ये महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार सरी बरसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यात पुन्हा पावसाचा अंदाज
पुण्यात (Pune) पावसाने मागील काही दिवसांपासून काढता पाय घेतला असल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मात्र येत्या चार ते पाच दिवसांमध्ये शहरात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मागील तीन दिवसांपासून शहरात साधारणपणे पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. तर दुसरीकडे बुधवारपर्यंत शहरामध्ये सामान्यत ढगाळ वातावरण निर्माण राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर मुसळधार सरींचा जोर कमी होणार असल्याचाही अंदाज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.