Devendra Fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

....म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वांची माफी मागावी: फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठीचे निलंबन रद्द केले आहे. यायबत बोलताना फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

पणजी: सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठीचे निलंबन रद्द केले. महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाचे स्वागत केले. (Devendra Fadnavis Latest News)

पणजीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र (Maharashtra) सरकारचे वर्तन हे असंविधानिक आहे. जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या 12 आमदारांना सरकारने निलंबित केले होते. यासाठी खोटी गोष्ट रंगवली, न घडलेले प्रसंग घडल्याचे सांगितले. मागच्या कोर्टाने त्यांना निलंबन मागे घेण्याची संधी दिली होती. मात्र, हे सरकार स्वत:ला सर्वोच्च समजते. आज सर्वोच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय चुकीचा ठरवला.

फडणवीस पुढे म्हणाले, सरकारने या 12 आमदारांवर (MLA) अन्याय केला आहे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना त्यांनी विधानसभेच्या बाहेर ठेवले. हा जनतेचा देखील अपमान आहे. हे आम्हाला मान्य नाही. महाविकास आघाडी सरकारने सर्वांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्र सरकारने किराणा दुकानात वाईन विकण्याची परवानगी दिली आहे. फडणविसांनी या निर्णयाचा निषेध केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT