Maharashtra Floods
Maharashtra Floods Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Flood: भिंत खचली..चूल विझली होते नव्हते गेले...

Sudhir Kakde

महाराष्ट्रात अतिवृष्टिमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून मागच्या दोन दिवसांत 129 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भूस्खलन आणि पुरामुळे (Maharashtra Floods) रायगड (Raigad) , रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या घटनांमध्ये अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत, कित्येक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता हेलिकॉप्टरने पूरग्रस्त महाडला रवाना झाले असुन त्यांनी या भागाची पहाणी केली आहे. NDRF (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) ची टीम रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात बचाव व मदतकार्य करत आहेत. (Maharashtra Flood Updates)

अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी गावात पूर आला आहे. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे, पूरात राज्यात राज्यात 76 लोकांचा मृत्यू. मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूरात 76 लोक मरण पावले आहेत. एकूण 38 लोक जखमी झाले आणि 30 लोक बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातून 90,000 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी बोलताना राज्यात पाऊस व पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांना परिस्थितीबद्दल माहिती देऊन राज्यपालांनी त्यांना मदत व मदतकार्य याबद्दल माहिती दिली.

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील तळाई गावात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. याच घटनेतील पिडीत असलेल्या अंकिता यांनी, "माझे घर वाहून गेले आहे. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. लोकांनी कर्ज घेऊन नवीन घरे बांधली होती. सगळ संपल.

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या माहिती महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 44 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 25 पेक्षा जास्त लोक अजूनही ढिगार्‍याखाली दबले आहेत. 35 लोकांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान रायगडमध्ये भुस्खलनाच्या लहाण मोठ्या 6 घटना घडल्या आहेत.

राज्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या नद्यांमधील पाण्याची पातळी धोक्याची चिन्हे ओलांडली आहे, तर कोकणातील रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात पावसाचे पाणी शुक्रवारी कमी होताना दिसून आले. कोल्हापूरची पंचगंगा नदी कालपासुन रौद्ररुप धारण करताना दिसते आहे. सांगलीची कृष्णा नदीही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे आजूबाजूचे परिसर पूर्णपणे जलमय झाले आहेत.

पुणे-बेंगळुरू महामार्ग पाण्यात बुडाला

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बचावकार्य सुरू आहे पण जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे बचाव पथकांना पोहोचणे सुद्धा कठीण झाले आहे. तर आतापर्यंत NDRFच्या 18 तुकड्या पूरग्रस्त भागात पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे पुणे-बेंगळुरू महामार्गसुद्धा पाण्यात बुडाल्याचे समजते आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT