Maharashtra News Twitter
महाराष्ट्र

Maharashtra News: मुंबईतील गिरगाव परिसरात एका गोदामाला भीषण आग, 14 गाड्या जळून खाक

या आगीत त्याच्या शेजारी उभी असलेली 14 वाहने जळून खाक झाली.

दैनिक गोमन्तक

दक्षिण मुंबईतील (Mumbai) एका गोदामाला गुरुवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. यामुळे त्याच्या शेजारी उभी असलेली 14 वाहने जळून खाक झाली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. गोदामात बांबू व इतर साहित्य ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

गिरगाव परिसरातील अंकुरवाडी येथील एका गोडाऊनमध्ये आग लागली , जी तळमजल्यावर ठेवलेल्या राळ, फेस, बांबू आणि इतर वस्तूंमध्ये पसरली, असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले. गोदामाच्या कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या सहा चारचाकी आणि आठ दुचाकी या आगीत जळून खाक झाल्याचे त्यांनी सांगितले. आगीमुळे गोडाऊनच्या तळमजल्यावरील संपूर्ण बांधकाम कोसळले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पहाटे तीनच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: मोठमोठे खड्डे, अर्धवट रस्ते; म्हापशात वाहनचालकांची तारेवरची कसरत; पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

अग्रलेख: राजकारणाचे ‘घरपण’

Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

‘गृहमंत्री गोव्‍याच्‍या मूडवर बोलले, गुंडगिरीवर नाही'; युरींचे टीकास्त्र; काणकोणकर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सांगे, कुंकळ्ळीत मेणबत्ती मोर्चा

RSS: 'महासत्तेसाठी संघ बनणार पंचप्राण'! CM सावंतांचे प्रतिपादन; गणवेषात विजयादशमी उत्सवात झाले सहभागी

SCROLL FOR NEXT