Mumbai  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa IRB Police: निवडणूक बंदोबस्तासाठी गोवा आयआरबी पोलिस पथकातील एक वरिष्ठ अधिकारी मुंबईत 'पर्यटन' करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Manish Jadhav

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी गोवा आयआरबी पोलिस पथकातील एक वरिष्ठ अधिकारी मुंबईत 'पर्यटन' करत असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी गोव्यातून आयआरबी पोलिसांच्या पाच कंपन्या पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येकी एक निरीक्षक, एक उपनिरीक्षक, दोन सहायक उपनिरीक्षक आणि 80 हवालदार आणि कॉन्स्टेबल मिळून 84 जणांच्या तुकडीसह 420 पोलिस, स्वयंपाकी आणि इतर मिळून 30 असा एकूण 450 जणांचा समावेश आहे. त्यांच्याबरोबर या कंपन्यांवर देखरेखीसाठी एक उपनिरीक्षक आणि त्यांच्याबरोबर ऑपरेटर म्हणून कर्मचारी निवडणूक ड्यूटीवर पाठवण्यात आलेत.

गोवा पोलिसांची टीम गेल्या 10 नोव्हेंबर रोजी मुंबईत दाखल झाल्या. यातील एक अधिकारी मुंबईचा आपला प्रायव्हेट दौरा असल्यासारखा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला. तो मुंबईभर फिरत आहे. एवढचं नाहीतर त्याच्या दिमतीला असलेले दोन पोलिसही त्याच्याबरोबर मुंबई पर्यटनाचा आनंद घेत आहेत. मात्र हे तीघे सोडून गोवा पोलिसांची टीम महाराष्ट्र निवडणूक बंदोबस्तात कार्यरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

SCROLL FOR NEXT