Ajit Pawar

 

Dainik gomantak

महाराष्ट्र

बेधडक अजितदादांच्या गाडीचे स्टेरिंग एका महिलेच्या हातात

उपमुख्यमंत्र्यांची गाडी सुसाट चालवणाऱ्या या रणरागिणीने या दौऱ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले..

दैनिक गोमन्तक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंधुदुर्गात पहिल्यांदाच दौरा होता. यंदाच्या आर्थिक वर्षातले फक्त तीनच महिने बाकी आहेत. जिल्ह्याच्या विकासकामांना दिलेल्या निधीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, माजी पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक उपस्थित होते.

या दौऱ्यात एक लक्षवेधी घटना घडली ती म्हणजे अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य हे महिला चालकाने केल्याचे दिसून आले. बेधडक अजितदादांच्या गाडीचे स्टेरिंग एका महिलेच्या हातात बघून सर्वांनाच कौतूक वाटले. मागे अजित पवार बसतले होते, त्यावेळे स्टेअरिंगवर एक महिला चालक दिसून आली. उपमुख्यमंत्र्यांची गाडी सुसाट चालवणाऱ्या या रणरागिणीने या दौऱ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलीस दलातील महिला चालकाने केले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तृप्ती मुळीक या चालकाच्या जागी बसलेल्या दिसत आहेत. तर गाडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री सतेज पाटील हे दिसत आहे.

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बैठकीचे नियोजन केले होते. जिल्ह्यातील कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव आणि चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि मदत व पुनर्वसनामुळे झालेल्या उपाययोजना व नुकसानीचाही त्यांनी आढावा घेतला. ते म्हणाले की यावेळी नवीन कोरोना (Corona) व्हायरस ओमरॉन वाढत आहे. शनिवारी रात्री देशाला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि कोरोनाव्हायरसविरूद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. त्यावरही पवार यांनी भाष्य केले. पवार म्हणाले की, राज्य सरकार पूर्ण तयारीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT