Maharashtra Din Wishes In Marathi Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Din 2025 Wishes: शूर मराठ्यांची भूमी...महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Maharashtra Din Wishes In Marathi: १ मे हा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो. १९६० साली या दिवशी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी माणसाच्या अस्मितेला, संस्कृतीला आणि भाषेला स्वतंत्र राज्याचा हक्क मिळाला.

Sameer Amunekar

Maharashtra Day Wishes In Marathi

१ मे हा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो. १९६० साली या दिवशी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी माणसाच्या अस्मितेला, संस्कृतीला आणि भाषेला स्वतंत्र राज्याचा हक्क मिळाला. हा दिवस केवळ एका प्रशासकीय बदलाचा नाही, तर लाखो मराठी जनतेच्या संघर्षाचे, त्यागाचे आणि एकतेचे प्रतीक आहे.

ब्रिटीश भारतातील ‘बॉम्बे प्रेझिडेन्सी’त मुंबईसह गुजरात व महाराष्ट्रातील अनेक भाग होते. स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली. मराठी भाषिक लोकांना हवे होते एक स्वतंत्र राज्य 'मराठी मनाचं महाराष्ट्र'!

या मागणीसाठी 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ' सुरू झाली. या चळवळीने उग्र स्वरूप धारण केले. दादर, गिरगाव, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलनं झाली. मुंबई मराठी माणसाचीच असावी, या मागणीसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले. १०६ हुतात्म्यांचे बलिदान हे या लढ्याचे उदाहरण आहे.

या सर्व संघर्षाला यश आलं १ मे १९६० रोजी. महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी ठरली. हे राज्य केवळ भौगोलिक रचनेचं नाही, तर मराठी अस्मितेचा किल्ला ठरला.

आज महाराष्ट्र देशातील एक आघाडीचे राज्य आहे. उद्योग, शेती, शिक्षण, कला, साहित्य, विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने उल्लेखनीय प्रगती केली आहे. या खास दिवशी तुम्ही प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी खाली दिलेले शुभेच्छा संदेश Maharashtra Day 2025 Wishes In Marathi पाठवू शकता.

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा संदेश Maharashtra Din Wishes In Marathi

  • "गर्व आहे आपल्याला महाराष्ट्राचा भाग असल्याचा! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

  • "शूर वीरांची, संस्कृतीची आणि परंपरेची भूमी – महाराष्ट्राला मानाचा मुजरा! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!"

  • "माझा महाराष्ट्र, माझा अभिमान! महाराष्ट्र दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!"

  • "छत्रपतींच्या महाराष्ट्राला महाराष्ट्र दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!"

  • "प्रगती, संस्कृती आणि समृद्धतेचं प्रतीक – महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!"

  • "एकी, प्रगती आणि अभिमानाची गाथा – महाराष्ट्र दिन साजरा करूया उत्साहात!"

  • "मराठी माणसाच्या मेहनतीची ओळख म्हणजे महाराष्ट्र! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

  • "जय महाराष्ट्र! चला एकत्र येऊया आणि महाराष्ट्र दिन साजरा करूया!"

  • "छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा – महाराष्ट्र दिनाच्या मंगल शुभेच्छा!"

  • "महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली, आणि भवितव्य उज्वल! शुभ महाराष्ट्र दिन!"

  • "महाराष्ट्र दिन आहे आपल्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि एकतेचा दिवस!"

  • "शब्दात नाही सांगता येणार असा महाराष्ट्राचा अभिमान! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!"

  • "जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र! महाराष्ट्र दिनाच्या कोटी शुभेच्छा!"

  • "महाराष्ट्राच्या मातीला मानाचा मुजरा! शुभ महाराष्ट्र दिन!"

  • "संस्कृती, साहित्य आणि शौर्य – हाच आपला महाराष्ट्र! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

  • "आपुलकी, बंधुता आणि संस्कृती – महाराष्ट्राचं खरं वैभव! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!"

  • "माझ्या मातीचा अभिमान – महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

  • "एकतेतून बळ – महाराष्ट्राचा मंत्र! शुभ महाराष्ट्र दिन!"

  • "शूर मराठ्यांची भूमी – महाराष्ट्र दिन साजरा करूया सन्मानाने!"

  • "आपण सारे मराठी, आपला महाराष्ट्र आपल्याला अभिमान! महाराष्ट्र दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT