Maharashtra Tribal Woman Crime Dainik Gomantak
महाराष्ट्र

Crime News: महाराष्ट्र हादरला! आदिवासी महिलेला गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांवर टाळाटाळ केल्याचा आरोप

Maharashtra Tribal Woman Crime: जामनेर तालुक्यातील सुकनाईक तांडा परिसरात एका 30 वर्षीय विवाहित आदिवासी महिलेला गुंगीचे औषध देऊन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

Manish Jadhav

Maharashtra Tribal Woman Crime: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. जामनेर तालुक्यातील सुकनाईक तांडा परिसरात एका 30 वर्षीय विवाहित आदिवासी महिलेला गुंगीचे औषध देऊन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला ही शेतमजूर म्हणून काम करते. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, पीडित महिलेला जेवणातून गुंगीचे औषध देण्यात आले होते. ती बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी तिला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर वारंवार सामूहिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर या अमानुष कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही आरोपींनी दिली. यादरम्यान, पीडितेच्या पतीने जेव्हा आपल्या समाजातील लोकांना आणि पोलिसांना मदतीसाठी फोन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी त्यालाही बेदम मारहाण केली.

या घटनेनंतर सुमारे एका महिन्याने आरोपींनी पीडितेचे दुचाकीवरुन पुन्हा अपहरण केल्याचा आरोप आहे. अखेर पीडित महिलेने अत्यंत धैर्याने 16 जुलै रोजी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार, एका संशयिताने बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला, तर इतर आरोपी तिथे पाळत ठेवून उभे होते. या प्रकरणी रामेश्वर गणपत राठोड, सुरज भीमसिंग राठोड, पवन छगन राठोड (सर्व रा. सुकनाईक तांडा) आणि भारमल कृपाल साबळे (रा. गोदरी तांडा, तालुका जामनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. यांच्याव्यतिरिक्त इतर 3 ते 4 अज्ञात आरोपींचा यात समावेश असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या दाव्यानुसार, पीडितेच्या पतीचा फोन आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक आणि उपअधीक्षकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी फोन कट केले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा पोलीस निरीक्षकांनी सुरुवातीला तक्रार घेण्यास नकार दिला आणि वीज नसल्याचे बहाणे सांगून वेळ वाया घालवला. या आरोपांवर उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत; तपासाच्या आधारे योग्य ती कडक कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ST Reservation: गोव्यात 'एसटी' आरक्षणाची केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी! चार मतदारसंघ राखीव, फळदेसाई-डिकॉस्टा-सिक्वेरा-कवळेकर यांचे राजकीय गणित बदलणार?

World Longest Hair Record: लांब केसांची भन्नाट क्रेझ! उत्तराखंडच्या महिलेनं रचला अनोखा रेकॉर्ड; केसांची लांबी पाहून तुम्हीही व्हाल थक्क Watch Video

खरी कुजबूज: आजारालाही वेळ ठरलेली?

Bikes Under 60000: कमी बजेटमध्ये घ्या शानदार बाईक! TVS, Heroसह 'या' बाईक्स देतील 70 kmpl पर्यंत जबरदस्त मायलेज; किंमतही खिशाला परवडणारी

Cricket Viral Video: अशी टीम तुम्ही कधी पाहिली नसेल! खेळाडू कमी पडल्यानं कुत्र्याला घेतलं संघात; मैदानातील व्हिडिओनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT