Maharashtra Chief Minister Eknath Shinde  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Active Mode वर; भाजप मंत्र्यांच्या अनुपस्थितीच पाहणी दौरा!

Maharashtra politics: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा चांगलाच तापला आहे.

Manish Jadhav

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी महाराष्ट्राचे रस्ते वाहतूक मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर या महामार्गाच्या कामावरुन निशाणा साधला होता. कदमांच्या टीकास्त्रानंतर राजकारण चांगलचं तापलं होतं.

याच पार्श्वभूमीवर आज (26 ऑगस्ट) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी पनवेल येथील पळस्पे फाटा येथून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. गणेशोत्सवापूर्वी कोकणातील या मुख्य महामार्गाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान, गेली 18 वर्षे प्रत्येक सरकारांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) मुद्यावर केवळ राजकारण केलं. कोणत्याच सरकारांनी या महामार्गाचे काम तडीस नेले नाही. आजही या महामार्गाच्या कामावरुन राजकारण केले जातेय. रायगड जिल्ह्यात महामार्गाचे काम अर्ध्याहून अधिक अपूर्ण आहे. महामार्गाच्या अनेक ठिकाणी काटकोनातील वळणे आहेत. अशा ठिकाणी नेहमी अपघात होतात. काही प्रसंगी प्रवाशांना जीवही गमवावा लागला आहे.

अशा या जीवघेण्या महामार्गाचे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी गेली 18 वर्षे कोकणवासीय करतायेत. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची तात्पुरती डागडूजी केली जाते. पण काही दिवसांत पुन्हा महामार्गावर खड्डे आणि महामार्गावरील अर्धवट कामकाजामुळे धोकादायक वळणांमुळे अपघातांना सुरुवात होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या अतीधोकादायक ठरलेल्या महामार्गाच्या विविध प्रश्नांवर नॅशनल हायवे प्राधिकारणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. याच अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची किती पूर्तता झाली आणि कशी पूर्ण होणार याचीच पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 2007 मध्ये सुरु झाल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. 2007 नंतर एवढी सरकारे आली पण महामार्गाचे काम होऊ शकले नाही, अशी खंत राज यांनी व्यक्त केली होती. रस्त्यांच्या दुरावस्थेवर ते म्हणाले होते की, केवळ कोकणातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबईहून नाशिकला जाण्यासाठी 8 तास लागतात. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडण्याबाबत राज ठाकरे यांनी येथे सुरु असलेले जमिनीचे व्यवहार हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले होते. कोकणी लोकांच्या जमिनी कवडीमोल दराने विकल्या जात आहेत. जेव्हा या महामार्गाचे काम पूर्ण होईल तेव्हा याच जमिनी व्यापाऱ्यांना विकल्या जातील. त्यामधून तुम्हाला काहीही मिळणार नाही. एकदा रस्ता झाला की आजूबाजूच्या जमिनींचे भाव गगनाला भिडतात हे समजून घ्या, असेही राज यांनी यापूर्वी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

Goa Cable Issue: ..अखेर मार्ग मोकळा! वीज खांबांवरील केबल्स कापल्या जाणार; गोवा खंडपीठाचा स्थगितीस नकार

SCROLL FOR NEXT