Wine at Grocery Shops And Supermarkets Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनवतयं आघाडी सरकार, फडणवीसांचा हल्लाबोल

हम दवा नहीं, हम दारू देंगे, महाराष्ट्र को मद्यराष्ट्र बनाएंगे हा या सरकारचा निर्णय आहे,सुधीर मुनगंटीवार.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोने चांगलंच तापलं आहे. भाजप चे बेगडं हिंदुत्व,नामर्द मुख्यमंत्री सत्ता काय तुमच्या बापाची आहे काय? पासून तर थेट मुंबईतील मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यापर्यंत चांगलच गाजत आहे. यावर दोन्ही पक्षाकडून चांगलेच आक्षेप घेतल्या गेले. हे निवळण्याचा काही अंदाज नसतांनाच, मंत्रिमंडळाच्या एका नव्या निर्णयावरून राज्य मंत्रिमंडळा ला भाजपने चांगलेच धारेवर धरले.

आज राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या एका निर्णयाची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्यानंतर त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

काय आहे निर्णय?

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी, राज्यात सुपर मार्केटमध्ये शोकेसमध्ये वाईनची (Wine) विक्री करता येणार असल्याचा निर्णय नवाब मलिक यांनी जाहीर केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं सुध्दा त्यांनी सांगितलं. 10000 चौरस फुटांच्या सुपर मार्केटमध्ये ही विक्री करण्यास परवानगी देण्यात आल्याचं ते म्हणाले. जेनेकरून वायनरीजसाठी लागणाऱ्या फळांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार

तर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवसी (Devendra Fadnavis) यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ते ट्विट च्या माध्यमातून म्हणाले की, "पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी, महाराष्ट्रात (Maharashtra) नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू...महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही." असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला इशारा दिला आहे.

“मस्त पियो, खूब जियो”

दरम्यान, या निर्णयावरून सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “मस्त पियो और खूब जियो हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे. करोनामध्ये सर्वसामान्यांना औषधीची आवश्यकता असतांना. हम दवा नहीं, हम दारू देंगे, महाराष्ट्र को मद्यराष्ट्र बनाएंगे हा या सरकारचा निर्णय आहे."

मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला खोचक टोला सुध्दा लगावतांना म्हणाले की, “आम्ही चंद्रपूरची दारूबंदी हटवली, वाईन प्रोत्साहन योजनेसाठी तब्बल चार वर्ष आम्ही पैसे दिले नाही. तर ते पैसे कोरोनाच्या आर्थिक संकटात दिले. आणि यांनी 300 टक्के असलेला विदेशी दारूवरचा कर हा 150 टक्के केला. स्वस्त दारू दिली पाहिजे पण वीज नाही.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2025: गोव्याशी भिडणार RCBचा कॅप्टन! रणजी करंडकमध्ये रंगणार थरार; 15 वर्षांनंतर चुरशीची लढत

Goa Politics: खरी कुजबुज; ही तर भाजप प्रवेशाची नांदी!

Sal River Boat Incident: ..मच्छीमार बोट रुतली गाळात! साळ नदीत अडकली माणसे; कुटबण जेटीजवळील दुर्घटना

Saligao Murder Case: भाड्याच्या खोलीत दोघांचा खून, संशयित रेल्वेने पसार झाल्याची शक्यता; पोलिसांची पथके रवाना

Rajinikanth Honoured at IFFI: इफ्फीत थलैवा 'रजनीकांत' यांचा होणार विशेष सन्मान! चित्रपट प्रवासाची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल गौरव सोहळा

SCROLL FOR NEXT