CM Eknath Shinde & Devendra Fadnavis  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra तील मंत्र्यांची संभाव्य यादी, जाणून घ्या कोणाला मिळणार मंत्रिमंडळात स्थान?

CM Eknath Shinde & Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Cabinet Ministers List: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यातच, उद्या राजभवनात दुपारी 12 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डझनभर मंत्री शपथ घेणार असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. महाराष्ट्र मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची नावेही समोर आली आहेत.

दरम्यान, भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, किसन कथोरे आणि नितेश राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. दुसरीकडे, शिवसेनेकडून (Shiv Sena) दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ आणि अनिल बाबर यांना मंत्री केले जाऊ शकते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण काय?

मुख्यमंत्र्यांच्या निकवर्तीयाने सांगितले की, "राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लवकरच होणार आहे, त्यामुळे आम्ही मंत्रिमंडळ विस्तारात 12 आमदारांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी शपथ घेणार्‍यांमध्ये काही विधान परिषदेचे सदस्यही असतील.''

मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबावर विरोधकांनी हल्लाबोल केला

गेल्या महिनाभरात शिंदे यांनी सात वेळा दिल्ली (Delhi) दौरा केला आहे. प्रत्येक दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या अटकळी बांधल्या जात होत्या. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिरंगाईवरुन मुख्यमंत्रीही विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, 'शिंदे यांनी त्यांच्यासोबत आलेल्या प्रत्येक आमदाराला मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते.' पवार पुढे म्हणाले, "आता शिंदे यांना दिलेले आश्वासन पूर्ण करता येत नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे. विलंब कशामुळे झाला हेही मुख्यमंत्र्यांनी सांगावे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

SCROLL FOR NEXT