भारत-पाकिस्तान संघर्षापासून सुरक्षा संस्था अलर्ट मोडवर आहेत. याचदरम्यान, पाकिस्तानला भारतीय गुप्तचर माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली देशाच्या विविध भागातून अनेकांना अटक करण्यात आली. अलिकडेच एटीएसने ठाणे येथील इंजिनिअर रवी वर्माला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली मुंबईतून अटक केली. पथकाने त्याची सुमारे 5 तास कठोर चौकशी केली, ज्यामध्ये अनेक महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगण्यात येते.
चौकशीदरम्यान असे आढळून आले की, रवीच्या संपर्कात असलेला आणखी एक तरुण पाकिस्तानी एजंटचा हेर होता. एटीएस या दुसऱ्या हेराचा शोध घेत आहे. रवी आणि या दुसऱ्या हेराला पाकिस्तानच्या (Pakistan) पीआयओ एजंटने हनी ट्रॅपद्वारे अडकवले होते. मुंबई, ठाणे, रायगड या महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती, फोटो, व्हिडिओ ब्लॅकमेलिंगद्वारे मिळवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
एटीएसचे गुप्तहेर रवीच्या बँक खाती आणि व्यवहारांबद्दल माहिती गोळा करत आहेत. यासोबतच, ते सोशल मीडिया फ्रेंड्स आणि ऑनलाइन नेटवर्कचाही तपास करत आहेत. सोशल मीडियाद्वारे त्याचे संशयास्पद परदेशी नेटवर्क होते असे मानले जाते. सुरक्षेचे उल्लंघन केल्याच्या संशयाखाली रवीची सातत्याने चौकशी सुरु आहे. रवी भारतीय युद्धनौकांची माहिती पीओआयला देत असल्याचा संशय आहे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने एटीएस आणि गुप्तचर संस्था सतर्क आहेत.
एटीएसने ठाण्यातील कळवा परिसरातील भाड्याच्या घरातही कारवाई केली, जिथे तो राहत होता. ठाण्यातील भाड्याच्या घरात पोलिसांनी छापा टाकला. यासोबतच, घरमालकाचीही चौकशी करण्यात आली. भाडेकरुची कागदपत्रे तयार करण्यात झालेल्या निष्काळजीपणाचीही चौकशी केली जात आहे. या तपासात स्थानिक पोलिसही मदत करत आहे. संपूर्ण प्रकरणाची डिजिटल फॉरेन्सिक चौकशी देखील केली जात आहे. फॉरेन्सिक टीम रवीच्या लॅपटॉप, मोबाईल आणि इतर उपकरणांचे सखोल विश्लेषण करत आहे. क्लाउड डेटा आणि ईमेल कम्युनिकेशन देखील स्कॅनवर ठेवण्यात आले आहे.
रवी वर्माच्या मित्रांची आणि नौदलातील ओळखीच्या लोकांची चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत 5 जणांची चौकशी करण्यात आली आहे. एटीएसने या तपासाचा आयआर किंवा अहवाल संरक्षण मंत्रालयालाही पाठवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्मा भारतविरोधी (India) कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या संशयास्पद नेटवर्कच्या संपर्कात होता. गुप्तचर माहितीच्या आधारे या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.