MVA Morcha Mumbai | Mahavikas Aghadi Maha Morcha  Dainik Gomantak
महाराष्ट्र

MVA Morcha Mumbai: महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा; तिन्ही पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा सहभाग

राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार या मोर्चाला संबोधित करणार आहेत.

Pramod Yadav

MVA Morcha Mumbai: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं आज मुंबईत महामोर्चा (Morcha) काढण्यात आला आहे. सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली असून, तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार या मोर्चाला संबोधित करणार आहेत. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.

मोर्चाचा उद्देश काय

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य. याशिवाय कर्नाटक सरकार सीमा प्रश्नावरून करत असलेले कट कारस्थान. तसेच, राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. आणि महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याचविरोधात महाविकास आघाडी सरकारने मोर्चा काढला आहे.

या मोर्चाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. दोघेही या सभेला संबोधित करणार आहेत. याशिवाय काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, आज एकीकडे मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा निघत असताना दुसरीकडं भाजपच्या वतीनं माफी मांगो आंदोलन करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT