Jyotiba temple kolhapur  Dainik Gomantak
महाराष्ट्र

जोतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत ई पास दर्शन व्यवस्था बंद करा

वयोवृद्ध भाविकांना जोतिबाच्या केवळ कळसाचे दर्शन घेऊन परतावे लागते. त्यामुळे लांबून येणाऱ्या भाविकांचाही हिरमोड होतो.

दैनिक गोमन्तक

जोतिबा डोंगर: कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे जिल्हा प्रशासनाने सुरू केलेली ई पास दर्शन व्यवस्था बंद करून परंपरेने सुरू असणारी दर्शन पध्दती सुरू करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ, पुजारी हक्कदार उत्कर्ष समितीतर्फे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन यासंबधी चर्चा करण्याचे आश्‍वासन ,स्थानिक ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांना दिले.

जोतिबा डोंगरावर नवरात्रोत्सवापासून कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने भाविकांसाठी ई पास दर्शन व्यवस्था सुरू केली आहे. याचा भाविकांना गहन त्रास होतो आहे. अनेक भाविक गोंधळून जातात. तर काहींना हा ई पास कसा काढावा हे देखिल माहिती नसतं. या दर्शन व्यवस्थेमुळे सर्व धार्मिक परंपरा मोडीत निघून भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. ई पास दर्शन व्यवस्था कायमस्वरूपी बंद करून जोतीबाचे दर्शन घेण्यासाठी रांगेची पध्दतच सुरू करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी उद्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर मार्ग काढू, असे आश्वासन दिले आहे.

या वेळी सरपंच राधा बुणे, कृष्णात बुणे, मच्छिंद्र बुणे, हक्कदार समितीचे अध्यक्ष नवनाथ लादे, आनंदा बुणे आदी उपस्थित होते. वयोवृद्ध भाविकांना केवळ कळसाचे दर्शन घेऊन परतावे लागते. त्यामुळे लांबून येणाऱ्या भाविकांचाही हिरमोड होतो. दरम्यान ही ई पास व्यवस्था आणखी पंधरा दिवस सुरू ठेवणार असल्याचे देवस्थान समितीने नुकतेच जाहीर केले आहे; परंतु या व्यवस्थेला जोतिबा डोंगर येथील स्थानिक ग्रामस्थ, पुजारी व गुरव समाजाचा विरोध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT