Koregaon Bhima Dainik Gomantak
महाराष्ट्र

Koregaon Bhima: आज 205 वा शौर्य दिन, विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी

कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे.

दैनिक गोमन्तक

पुण्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. आज दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. अनेक राजकिय नेत्यांनीही येथे हजेरी लावली आहे.

या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी आज येणार आहेत. पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. 205 वर्षांपुर्वी कोरेगाव भीमा इथं झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

कोरेगाव इथे 1 जानेवारी 1818 मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते.

हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधण्यात आला. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकर अनुयायी यांच्यासह इतरही लाखोंच्या संख्येनं लोक या ठिकाणी येतात.

  • नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार

या वर्षी शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा परिसरात म्हणजेच शिक्रापूर आणि लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या कालावधीत मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात परिसरातील सर्व मद्य दुकाने पूणर्तः बंद राहणार आहेत. या बंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT