रत्नागिरी: उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनानं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १० एप्रिल २०२५ पासून या विशेष गाड्यांच्या फेऱ्या सुरू होणार आहेत.
गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत मुंबई सीएसएमटीहून ००:२० वाजता सुटेल आणि ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता करमाळीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११५२ करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत करमाळीहून दुपारी १:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.
गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक (टी) – करमाळी विशेष साप्ताहिक १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक (टी) येथून २२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता करमाळीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३० करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ११/०४/२०२५ ते ०६/०६/२०२५ पर्यंत दर शुक्रवारी करमाळीहून दुपारी २:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांवर थांबेल.
गाडी क्रमांक ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष साप्ताहिक ही गाडी दर गुरुवारी, ०३/०४/२०२५ ते २९/०५/२०२५ पर्यंत लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ही गाडी ०५/०४/२०२५ ते ३१/०५/२०२५ पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम उत्तर येथून सायंकाळी ४:२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ००:४५ वाजता पोहोचेल.
गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंदोब रोड, मुकुंदोब रोड, कुंडुरा रोड सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकांवर थांबेल.
विशेष गाड्यांचे तिकीट आरक्षण www.irctc.co.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच, या गाड्यांचे थांबे व तपशीलवार माहिती www.enquiry.indianrail.gov.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.