Konkan Railway Superfast trains stop at Sawantwadi Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! सावंतवाडी स्थानकावर तीन सुपरफास्ट गाड्यांना थांबा, 'असं' असेल वेळापत्रक

Konkan Railway Superfast trains stop at Sawantwadi: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

Sameer Amunekar

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटन हंगाम, गणेशोत्सव आणि वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाला आणखी तीन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचे अधिकृत थांबे मंजूर करण्यात आले आहेत. कोकण रेल्वे महामंडळाने याबाबतची अधिसूचना जारी केली असून 26 जुलै 2026 पासून टप्प्याटप्प्याने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश

सावंतवाडी रोड स्थानकावर अधिक रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मार्च 2026 मध्ये यासंदर्भात पाठविण्यात आलेल्या पत्राची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक निर्णय घेतला. त्यानुसार राजधानी एक्स्प्रेस, गरीब रथ एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-मंगळुरू सुपरफास्ट एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना सावंतवाडी रोड येथे अधिकृत थांबा देण्यास मंजुरी देण्यात आली.

कोकणातील प्रवाशांना होणार मोठा फायदा

पावसाळ्यात कोकणातील निसर्ग अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. तसेच गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधून हजारो कोकणवासी आपल्या गावी परततात. अशा वेळी सावंतवाडी रोड स्थानकावर अधिक गाड्यांचे थांबे उपलब्ध झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच प्रवाशांना पर्यायी रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहेत.

या गाड्यांना मिळणार सावंतवाडी रोडवर थांबा

सीएसएमटी – मंगळुरू – सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (दररोज)

  • गाडी क्र. 12133 (सीएसएमटी – मंगळुरू)
    सावंतवाडी रोड आगमन – सकाळी 7.02
    प्रस्थान – सकाळी 7.04
    अंमलबजावणी: 26 जुलै 2026

  • गाडी क्र. 12134 (मंगळुरू – सीएसएमटी)
    सावंतवाडी रोड आगमन – रात्री 11.30
    प्रस्थान – रात्री 11.32
    अंमलबजावणी: 27 जुलै 2026

राजधानी एक्स्प्रेसलाही थांबा

हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस (आठवड्यातून तीन दिवस)

  • गाडी क्र. 12432 (निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम)
    आगमन – सकाळी 6.18
    प्रस्थान – सकाळी 6.20
    अंमलबजावणी: 26 जुलै 2026

  • गाडी क्र. 12431 (तिरुवनंतपुरम – निजामुद्दीन)
    आगमन – सकाळी 9.44
    प्रस्थान – सकाळी 9.46
    अंमलबजावणी: 28 जुलै 2026

गरीब रथ एक्स्प्रेसचाही समावेश

एलटीटी – तिरुवनंतपुरम गरीब रथ एक्स्प्रेस (आठवड्यातून दोन दिवस)

  • गाडी क्र. 12201 (एलटीटी – तिरुवनंतपुरम)
    आगमन – पहाटे 2.02
    प्रस्थान – पहाटे 2.04
    अंमलबजावणी: 27 जुलै 2026

  • गाडी क्र. 12202 (तिरुवनंतपुरम – एलटीटी)
    आगमन – पहाटे 3.28
    प्रस्थान – पहाटे 3.30
    अंमलबजावणी: 30 जुलै 2026

पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना

सावंतवाडी रोड स्थानकावर या महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे सुरू झाल्यामुळे केवळ प्रवाशांचाच फायदा होणार नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कोकणातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे आणि पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनाशी संबंधित उद्योगांनाही याचा सकारात्मक फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT