Kirit Somaiya Dainik Gomantak
महाराष्ट्र

INS Vikrant Case: 'विक्रांत' मध्ये एका दमडीचा घोटाळा केला नाही'

आयएनएस विक्रांतमध्ये (INS Vikrant Case) एका दमडीचाही घोटाळा झाला नसल्याचे सोमय्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमन्तक

भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने म्हटलयं की, '18 ते 22 एप्रिल दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेसमोर जा आणि तपासात सहकार्य करा.' पोलिसांनी अटक केल्यास तात्काळ 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश न्यायालाने दिले आहेत. (Kirit Somaiya has said that there was no scam in INS Vikrant)

दरम्यान, आता किरीट सोमय्या (Kirit Somaiya) मीडियासमोर आले आहेत. त्यांनी यावेळी माध्यमाशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला. त्याचबरोबर आयएनएस विक्रांतमध्ये एका दमडीचाही घोटाळा झाला नसल्याचे सोमय्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

किरीट सोमय्या म्हणाले, ''मुंबई उच्च न्यायालयाचे आभार म्हणतो. न्यायालयाने आता जे काही विचारले आहे, तेच मी मागील काही दिवसांपासून ठाकरे सरकारला विचारत होतो. आता खऱ्या अर्थाने न्यायाची प्रक्रीया सुरु झाली आहे. आयएनएस विक्रांतमध्ये एका दमडीचा देखील घोटाळा झालेला नाही. ठाकरे सरकारच्या अनेक घोटाळ्यांचा आम्ही पर्दाफाश केला आहे. 58 कोटींच्या रकमेचा घोटाळा कुठे झाला आहे, ते राऊतांनी सांगावे. हसन मुश्रीफ, यशवंत जाधव, अनिल परब यांनी केलेल्या घोटाळ्याचा आता पर्दाफाश होणार आहे. उध्दव ठाकरे यांच्या नातेवाईंकांनीही घोटाळा केला आहे. त्याचाही आम्ही लवकर पर्दाफाश करणार आहोत.''

तसेच, न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सोमय्या यांनी म्हटले होते की, 'तक्रार दाखल करण्यास विलंब झाला असून ती तब्बल नऊ वर्षांनी दाखल करण्यात आली आहे.' शिवसेना, काँग्रेससह इतर पक्षांकडूनही आयएनएस विक्रांतला (INS Vikrant) वाचवण्यासाठी निधी गोळा करण्यात आला होता, असंही किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. पैसे गोळा करण्याची मोहीम त्यांनी वैयक्तिकरित्या चालवली नसून ती पक्षाच्या पातळीवर चालवली होती, असं देखील सोमय्यांनी म्हटलं आहे. तत्पूर्वी, विशेष न्यायाधीश आर. के. रोकडे यांनी सोमय्या यांची याचिका फेटाळून लावली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT