महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलंच गाजत आहे. यातच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडी सरकारवर पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला. यावेळी सोमय्यांनी नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघात केला. मनी लॉंड्रींगमध्ये सहभागी असणारा चतुर्वेदी पळून गेला असल्याचे देखील सोमय्यांनी म्हटले आहे.
समोय्या म्हणाले, ''नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्या तीन कंपन्यांच्या व्यवहाराचा खुलासा यापूर्वीच मी केला होता. आता मी असं मानू का की, ठाकरे सरकारने नंदकिशोर चतुर्वेदीच्या माध्यमातून मनी लॉंड्रींग केले आहे. उध्दव ठाकरे यांच्या मेहुण्याने उभारलेल्या कंपनीमध्ये मनी लॉंड्रिंगच्या माध्यमातून पैसा आला आहे. नंदकिशोरबाबत उध्दव ठाकरे गप्प का? मुख्यमंत्र्यांचा श्रीजी कंपनीशी काय संबंध आहे, तो त्यांनी खुलासा करावा. हवाला किंग चतुर्वेदी कुठे लपून बसलाय?''
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने म्हटलयं की, '18 ते 22 एप्रिल दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेसमोर जा आणि तपासात सहकार्य करा.' पोलिसांनी अटक केल्यास तात्काळ 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश न्यायालाने दिले आहेत. विमानवाहू जहाज INS विक्रांतला तोडण्यापासून वाचवण्यासाठी जमा केलेल्या 57 कोटी रुपयांहून अधिक रकमेशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.